अभिनव भारत फाऊंडेशनची तालुका शाखा कारंजा येथील कार्यालयाचे उदघाटन संपन्न…

0

कारंजा / येथे २० फेब्रुवारी रोजी अभिनव भारत फाउंडेशनचे कारंजा शाखा येथील उदघाटन करण्यात आले.संस्थचे नियमानुसार आजी-माजी सैनिक यांच्या हस्ते कार्यालयाचे उदघाटन केले.त्यानुसार कारंजा येथील माजी सैनिक गजानन चौधरी  यांच्या शुभहस्ते रिबीन कापून कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. तसेच अभिनव भारत फाऊंडेशचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुराग गो. वांदिले यांच्या हस्ते दीपप्रज्व्लन व प्रतिमा पूजन करण्यात आले. वर्धा जिल्हा व्यवस्थापक सचिन पाटील यांनी उपस्थित महिलांना अभिनव भारत फाऊंडेशन बद्दल सविस्तर माहिती दिली.सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे पुष्पाताई गोहते, कल्पनाताई कामटकर,निर्जलाताई ढोबले, अनुसयाताई रवकाळे यांचे मार्गदर्शन लाभले. कारंजा प्रभाग सनमव्यक वर्षाताई बारई, प्रतिमाताई देशभ्रतार,जयश्रीताई ढोंगे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच मिनाक्षी गाडगे, वर्षा उघळे, राखी डोंगरे यांनी कार्यक्रमाची जबाबदारी सांभाळली.

 चैताली गोमासे साहसिक न्यूज /24 सेलू 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!