अमरावतीमध्ये चौथ्या माळ्यावरून उडी घेत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या
साहसिक न्यूज 24
प्रतीनिधी/अमरावती :
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील खल्लार पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी बाळकृष्ण राठोड ( ५० ) यांनी आज सकाळी पोलीस हेडकॉटर इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. सदर आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. मृतक राठोड यांना दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करिता दाखल करण्यात आलेले आहे.. सदर घटनेचा पुढील तपास पोलिस उपविभागीय अधिकारी दर्यापूर करीत आहे. काल वलगाव पोलीस स्थानकात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. लगेच आज राठोड यांनी देखील आत्महत्या केल्याने पोलीस खात्याला झालंय तरी काय असा प्रश्न उपस्थित