अर्धांगिनींच्या अपघाती मृत्यूनंतर रुग्णालयात घटका मोजणाऱ्या पतीनेही सोडला देह
Byसाहसिक न्यूज24
प्रमोद पाणबुडे/ वर्धा :
सेलू पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या रमना फाटा येथे उभ्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात बोरगाव (मेघे) येथील ठाकरे दाम्पत्य गंभीर जखमी झाले. हा अपघात काल 6 रोजी रात्री 9.20 वाजता झाला. या अपघातात पत्नीचा त्यानंतर कोमात असलेल्या पतीचा आज 7 रोजी सकाळी मृत्यू झाला.
बोरगाव (मेघे) येथील ठाकरे ट्रॅव्हल्स कंपनीचे संचालक अजय ठाकरे व पत्नी मनीषा हे दोघेही दुचाकीने सेलू येथे घरघुती कार्यक्रमासाठी गेले होते. परत येताना रमणा फाटा येथे अज्ञात वाहनाने त्यांच्या एम. एच. 32 एन. 9481 क्रमांकाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात ठाकरे दाम्पत्य गंभीर जखमी झाले. अपघात होताच परिसरातील नागरिकांनी त्यांना सेवाग्राम रुग्णालयात भरती केले. दरम्यान, आज सकाळी मनीषाचा पहाटे 4.30 वाजता मृत्यू झाला तर अजयची प्रकृती अत्यावस्त असल्याने त्याला नागपूर येथे नेण्याचा सल्ला देण्यात आला. नागपूर येथे नेले असता त्याचाही 10.15 वाजता मृत्यू झाला. दोघांवरही बोरगाव मेघे येथील स्मशानभूमीत एकाच सरणावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे 12 वर्षांचा मुलगा व 8 वर्षांची मुलगी आहे. या घटनेने बोरगाव मेघे येथे शोककळा पसरली आहे.