वर्धा / तळेगाव शेत शिवारा मध्ये दिनांक 11 फेब्रुवारी रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकाचे नुकसान झाले तसेच खरीप हंगामातील काही शेतकऱ्याच्या तक्रारी विमा कंपन्याकडे दाखल केले असता किंवा कॉल केले असता कोणताही प्रतिसाद निळत नसल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे, त्यात हे रब्बी पिकाचे नुकसान न सोसण्यासारखे झालेले आहे. तसेच शेत मालाला योग्य दरवाढ न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे, त्यात हे दिनांक 11 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या नुकसानी मुळे शेतकऱ्याचे कंबरडेच मोडले आहे, तरी सदर पिकांचे पंचनामे करून योग्य ती नुकसान भरपाई देण्यात यावी असे निवेदन तहसीलदार आष्टी यांना देण्यात आले तसेच मा.जिल्हाधिकारी साहेब वर्धा यांच्या माहिती करिता मा. उपविभागीय अधिकारी आर्वी यांच्या माहितीकरिता मा. तालुका कृषी अधिकारी आष्टी त्यांना सुद्धा निवेदनाच्या प्रतिनिफिक देण्यात आल्य निवेदन देताना शेतकऱ्याची उपस्थिती विवीन बामनरावजी पाचपोर किशोर संतोषराज शनोटकर अंकुश किशोर शनोटपुर- प्रभाकर मकर रातोपुर विनोद मधूकर रानोखुर हे शेतकरी उपस्थित होते