आंजी (मोठी) येथे ईद ए मिलादुन्नबी उत्सहात साजरी…
स्थानिक मुस्लिम समुदायाने इस्लाम धर्माचे चे पैगंबर हजरत मोहम्मद (स. अ. स) यांचा जन्मोत्सवमोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यक्रम जामा मशिद येथे पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मशिद ट्रस्ट चे अध्यक्ष मुजम्मील खान सौदागर तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून वर्धा येथील जामा मशिद चे इमाम हाफीज मुजम्मील सहाब होते तसेच आंजी चे इमाम फरीदुल कादरी उपस्थित होते.यावेळी प्रमुख हाफीज मुजम्मील सहाब यांनी हजरत मोहम्मद (स. अ. स.) यांच्या जीवन व त्यांनी केलेले सर्व समावेशक कार्य यावर सविस्तर माहिती दिली. तसेच तसेच जामा मशिद चौकातुन शिस्तबद्ध पद्धतीने जुलूस काढण्यात आला.जुलुस चे ग्रामपंचायत प्रशासन तर्फे स्वागत करण्यात आले.यामध्ये सरपंच जगदीश संचेरीया यांनी इमाम फरिदुन कादरी सहाब,मशिद ट्रस्ट चे अध्यक्ष मुजम्मील खान सौदागर, यांचे हार टाकुन व मिठाई देऊन स्वागत केले यावेळी खरागंणा पोलीस स्टेशन चे ठाणेदार बावणे , पोलिस उपनिरीक्षक सानप, प्रेरणा फाऊन्डेशन चे सुनिल भांदककर, अवघडनाथ महाराज ट्रस्ट चे गजानन ताल्हण, पोलीस पाटील सौ. ढोबळे, मानवता बहुउद्देशीय संस्था चे रफीक शेख व इतर उपस्थित होते. तसेच बसस्थानक चौकात ग्रामपंचायत सदस्य सतिश पवार, निखिल गोमासे मित्र परिवार व कौमी एकता ग्रुप यांच्या तर्फे स्वागत व लंगर चे आयोजन करण्यात आले. मशिद चौकात संविधान दिन उत्सव समिती व राकेश डंभारे मित्र परिवार तर्फे स्वागत व थंड पेय वाटप करण्यात आले. यातुन राष्ट्रीय एकात्मता चे दर्शन झाले.सर्वात शेवटी मशिद च्या समोरील मैदानात परचम कुशाई करून फातेहा व सलाम ने सांगता झाली. सर्व कार्यक्रमास आंजी व परिसरातील मुस्लिम बांधव उपस्थित होते.
गजेंद्र डोंगरे सहासीक न्यूज-24