आंजी (मोठी) येथे एकाच रात्री सात घरे फोडली
प्रतिनिधी / वर्धा :
आंजी (मोठी) येथे गुरुवारी रात्र दरम्यान गावातील सात कुलूप बंद असलेली घरे फोडून चोरट्यांनी डल्ला मारला आहे. आंजी (मोठी) येथील गुप्ता वॉर्डात असलेल्या सात घरांना अज्ञात चोरांनी टार्गेट केले आहे. घरातील मंडळी गावाला गेल्याची संधी शोधून हा डाव साधण्यात आला आहे.
शुक्रवारी सकाळी गावातील वेगवेगळ्या वार्डात सात कुलुप बंद असलेले घर फोडी झाल्याची घटणा उघडीस आल्याने गावात गावात खळबळ उडाली. रात्री अज्ञात चोरानी आंजी मोठी गावातील वार्ड क्र १ मधील गुप्ता लेआऊट मधील दिवाकर गायकवाड यांच्या घरी, इंदीरा नगर मधील सैय्यद नुर अली मजर अली, मास्टर काँलनीत अशोक बिसे, डाँ. प्रमोद लोहकरे, वार्ड क्र २ मधील बाजार चौकातील महेबुब ईस्माइल शेख, वार्ड क्रं ३ मधील महेश सुरेश दांडेकर, वार्ड क्र ४ मधील सुदाम महाजन यांच्या कुलूप बंद घराचे कुलुप तोडुन चोरीसाठी आत शिरले. सात पैकी दोन घरात चोरट्यानी हात साफ केला तर इतर चार घरात काहीच मिळाले नाही.
मेहबुब ईस्माइल शेख घरी एकटे असल्याने तब्बेत बरी वाटत नसल्याने नातेवाईकाकडे झोपायला गेले होते. यांच्याकडील कुलुप फोडुन चार हजार नगदी, चांदीच्या आठ हजार रुपये किंमतीचे तोरड्या, एक पोत तर महेश दांडेकर यांच्या कडील खिशात असलेले पंधराशे रुपये चोरटायानी लंपास केले.
सुदाम महाजन यांच्या कडील कुलुप फोडुन आत शिरले असता लाईट एवजी बेल ची बटन दबल्याने वरच्या रुम मध्ये झोपलेले सुदाम महाजन जागे झाल्याने चोरट्यानी पळ काढला.
तर महेश दांडेकर हे घरा कुलूप लावुन स्लँप वर झोपले होते. जेव्हा सकाळी उठल्यावर कुलुप फोडल्याचे लक्षात आले व घरात सर्व काही व्यवस्थीत होते. पँन्ट च्या खिश्यातील पंधराशे रूपये चोरी झाले होते. तसेच दिवाकर गायकवाड, डाँ. प्रमोद लोहकरे, अशोक भिसे, सै नुर अली हे गावी गेले होते त्यामुळे घर कुलुप बंद होते. सकाळी पोलीस चौकीला चोरीची माहीती मिळताच खरांगणा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष शेगावकर, पोलीस उपनिरीक्षक सानप, चौकी प्रभारी कामडी, गिरीश चंदनखेडे व चमुने त्वरीत पंचनामे करून वर्धा येथुन श्वान पथक व ठसे तपासणी तज्ञ यांना प्राचारण करुन ठानेदार शेगावकर यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू केला आहे.