आंतरराष्ट्रीय धर्मादाय दिनानिमितय गरीब व गरजु लोकांना वस्त्र वितरणाचा कार्यक्रम, सहाय्यक धर्मदाय आयुक्त वर्धा निलेश काळे यांच्या शुभ हस्ते.
मानव सेवा हिच ईश्वर सेवा. निलेश सु काळे सहाय्यक धर्मदाय आयुक्त वर्धा यांचे प्रतिपादन
सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय वर्धा व सार्वजनिक नोंदणीकृत देवस्थान यांच्या संयुकत विद्यामाने आंतरराष्ट्रीय धर्मदाय दिन या उपक्रमा अंतर्गत समाजातील अत्यंत गरजूवंत महिला भगिनींनाणन साडी व पुरुषांना ब्लॅंकेट (वस्त्र )वाटप कार्यक्रम ठानेगाव येथील जगदंबा माता देवस्थान येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी सर्वप्रथम पंच कोशित प्रसिद्ध असलेली जगदंबा माता यांना माल्यर्पण करून पूजन व अभिवादन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. वस्त्र दान करण्याची संकल्पना महेंद्र के महाजन धर्मदाय आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांची होती तर सदर उपक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक सुनीता वी तरार धर्मादाय सह आयुक्त नागपूर विभाग नागपूर या आहेत तर सदर आज आयोजित केलेल्या कार्यक्रमात निलेश सु काळे सहाय्यक धर्मदाय आयुक्त वर्धा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करीत आपण ज्या समाजात माणूस म्हणून जन्मलो त्या समाजातील गरजू, गरीब, व निराश्रित व्यक्तींची सेवा करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे असे विचार मांडले.यावेळी विचार मंचकावर रविन्द्र टप्पे ओम नव शक्ती अंबिका भक्तीधाम संस्थान बोपापूर वाणी सचिव,भंडारी साई सेवा मंडळ वर्धा उपध्यक्ष, श्रीकांत गांधी व रुपेश कानेटकर साई सेवा मंडळ वर्धा, अनिल कापसे,भास्करराव वाढई अध्यक्ष संत काळे महाराज देवस्थान खरंगना, जगदंबा देवस्थान अध्यक्ष रमेश दलाल व सचिव दिलीप ठाकरे , तथा पदाधिकारी उपस्थित होते तर विचार मंचकावर ऍड अमर दुबे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड श्रीपाद नरेंद्र कुलकर्णी यांनी केले तर आभार ऍड महेश बबनरावं धाये यांनी मानले. तर कार्यक्रम यशस्वी तेसाठी भास्करराव वामनरावं पांडे, अमिता रंगे व समतादूत सिद्धार्थ सोमकुवर यांनी अथक परिश्रम केले.
अविनाश नागदेवे सहासिक न्यूज-24