आकोली येथील चार मुले बेपत्ता ; वर्धेच्या रेल्वे स्टेशन वरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चारही मुले काही
साहसिक न्युज24
प्रमोद पाणबुडे/ वर्धा:
वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील आकोली येथील चार मुले बेपत्ता झाली आहेय. अचानक एकाचवेळी चार मुले बेपत्ता झाल्याच्या या घटनेने चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे. सेलू पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार दाखल करण्यात आली असून मध्यरात्री अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात चारही अल्पवयीन मुलांचा समावेश आहेय. मुलांचा शोध सुरू असून वर्धा जिल्ह्यात सर्वत्र नाकेबंदी करण्यात आली आहे. पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर असून जिल्ह्याच्या सीमा तपासल्या जात आहे.
वर्धा जिल्ह्यातील आकोली गावातील गोसावी समाजाची चार मुले दुपारी दोन ते तीन वाजताचे दरम्यान बेपत्ता झालीय. पप्पू देवडे वय १३ वर्षे, संदीप बुराणे वय ८ वर्षे, राज राजेश येडाणी १३ वर्षे , राजेंद्र राजेश येडाणी वय 14 वर्षे अशी या बेपत्ता झालेला मुलांची नावे आहेत. या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात कलम ३६३भादवी नुसार अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आले आहे..