आमदार केचेंनी दिली बांबर्डा गावाला भेट,.प्रशासनाला उपाययोजना करण्याचे निर्देश……

0

आष्टी (शहिद ) / विधानसभा आमदार दादाराव केचे यांनी नुकसान झालेल्या घरांची पाहणी करून बांबर्डा येथील काही रहिवाशांना आर्थिक मदतीचा हात दिला .आष्टी या तालुक्याच्या ठिकाणापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या बांबर्डा गावात रविवार, २८ एप्रिल रोजी पहाटे विजांचा कडकडाट सुरु झाला. सोबतच वादळी पाऊस व गारपीट होते. ३० मिनिट चाललेला निसर्गाचे तांडव होत्याचे नव्हते करण्यास कारण ठरला. इतर घरांचा नुकसानीचा अंदाज नाही. गावासभोवताल असलेली अनेक बाभळीची हिरवीगार झाडे मुळासह उलमडून पडली. गावाच्या शिवेवर असलेल्या मुख्य विद्युत वाहिनीचे ३५ खांब जमिनीवर पडले.या वादळाच्या विक्राळ तांडवात दहा घरांवरील टिनाची छते पूर्णपणे उडाली. बाभाळीची झाडे जमिनीवर पडली तर काही घरावरील कवेलू पत्त्यासारखे उडत जमिनीवर आले. नैसर्गिक संकटात काही ग्रामस्थ सुखरूप बचावले असून काहींना किरकोळ इजा झाली. यात ३५ विद्युत खांब पडले. त्या खांबवरील तारा जागोजागी तुटून दूरवर जाऊन पडल्या. हे दृष्य भयानक असताना गावकरी भयभीत झाले होते. तलाठी ,ग्रामसेवक, कोतवाल, पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत कर्मचारी हे सर्व दिवसभर पंचनामा करून पाहणी करीत होते. विद्युत वाहिनीच्या तारा दुरुस्ती सुरू आहे .गावात पाणीटंचाई असताना वीजवितरण कंपनीने विद्युत पुरवठा तात्काळ सुरळीत करावा अशी गावकऱ्यांची मागणी होती . येथील ग्रामस्थांकडे असलेल्या मोबाइलमध्ये चार्जिंग नसल्याने ग्रामस्थांना इतर कुणाशी संपर्क साधता आलेला नाही. विद्युतपुरवठा नसल्यामुळे पाणीपुरवठा करणारी यंत्रणा पूर्णपणे ठप्प झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी गावकरी यांची धावधाव सुरू होती. . चाळीस तासांनंतरही सर्व गावकरी अंधारात होते. ज्या नागरिकांची घरावरील छते उडाली. त्यांना राहण्याची व्यवस्था नातेवाईकांच्याकडे करण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला. तलाठी हसिब शेख, ग्रामसेवक अनुराधा धारपुरे, कोतवाल उमेश बिजवे, सरपंच लता कडताई, उपसरपंच रमेश बगळेकर, पोलीस पाटील मोहित बगलेकर ही मंडळी परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. त्यांनी प्रशासनाला माहिती दिली.आमदार दादाराव केचे यांनी गावात येऊन परिस्थिती जाणून घेतली. विद्युतविभाग, वनविभाग, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळावर बोलावून मदतीचे आवाहन केले. विद्युत व्यवस्था तत्काळ सुरळीत करण्यासाठी उपाययोजना करा, अशा सूचना केल्या. ग्रामस्थांनी समस्यांचा पाढा वाचताच आमदार गहिवरले आणि अनेकांना रोख रकमेची मदत केली व मदतीसाठी आम्ही अधिक उपाययोजना करू असे आश्वासन ग्रामस्थांना दिले.

नरेश भार्गव साहसिक न्यूज /24 आष्टी शहीद 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!