🔥 नारायणपूर शिवारातील घटना. 🔥दोन आरोपींना केली अटक
सिंदी रेल्वे / मौजा नारायणपूर शिवारातील शेतातून मोटारपंप चोरून नेल्याची तक्रार सिंदी पोलिसात नोंद झाली. याप्रकरणी पोलिसांनी तपासाला गती देत अवघ्या २४ तासात दोन आरोपींना मुद्देमालासह अटक करून बेड्या ठोकल्या. गणेश बंडू भोयर (३०) राहणार कळमना तालुका समुद्रपूर जिल्हा वर्धा व शंकर दिवाकर मुडे (२७) राहणार मारडा तालुका समुद्रपूर जिल्हा वर्धा अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत सिंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकरी सुनील राजेंद्र अवचट राहणार कांढळी यांची मौजा नारायणपूर येथे शेती असून त्यांच्या विहिरीतून शनिवार दिनांक ४ मे रोजी कोणीतरी अज्ञात आरोपींनी त्यांच्या विहिरीतील ओलितासाठी लावलेली ५ एच. पीची मोटरपंप चोरून नेला. याप्रकरणी अवचट यांनी सिंदी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यामुळे तक्रारीच्या आधारे सिंदी पोलिसांनी तपासाला गती देत मुखबिरकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी गणेश बंडू भोयर व शंकर दिवाकर मुडे या दोन आरोपीला अटक करून पोलिसी हिसका दाखवताच चोरी केलेली मोटारपंप सिंदी शहरातील भंगार विक्रेता शहेजाद हबीब शेख याला विकल्याची कबुली दिली. त्यामुळे भंगार विक्रेता शेख यांच्या दुकानातून ५ एच.पीची १० हजार ५०० रुपये किमतीची तसेच गुन्ह्यात वापरलेली एम.एच.ए.ए-१९४५ क्रमांकाची होरो स्पेडर कंपनीची दुचाकी किंमत ४० हजार रुपये असा एकूण ५० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल दोन्ही आरोपींच्या ताब्यातून हस्तगत केला.
याप्रकरणी पोलिसांनी चोरीतील दोन्ही आरोपींना अटक केली असून आरोपींविरुद्ध कलम ३७९, ४११, ३४ नुसार सिंदी पोलिसात गुन्ह्याची नोंद केली. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक नुरूल हसन, अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. सागर कुमार कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांचे मागदर्शनात ठाणेदार देवेंद्र ठाकुर, पोलीस उपनिरीक्षक श्यामसुंदर सुर्यवंशी, पोलीस हवालदार आंनद भस्मे, रवि मोरे, कांचन चाफले, उमेश खामनकार, शिवाणी निकम व सर्व नेमणुक पो.स्टे. सिंदी (रेल्वे) यांनी केली.