आर्वी येथील भरदिवसा नग्न माथेफिरू मनोरुग्ण युवकाने केला दोन वृद्ध इसमाचा खून…

0

🔥हेच ते आर्वी येथील भरदिवसा नग्न माथेफिरू मनोरुग्ण युवकाने केला दोन वृद्ध इसमाचा खून.

🔥इंदिरा चौक भाजीबाजारातील घटना,त्या माथेफिरू युवकास दोरीने काठीला बांधून केले पोलिसांच्या हवाली.

आर्वी -/ भरदिवसा एका माथेफिरू युवकाने भाजीबाजारात काठीने व दगडाने ठेचून दोन वृद्ध इसमाचा खून केल्याची घटना आज दिनांक २१ जानेवारीला सकाळी १०.०० वाजता दरम्यान घडली. त्या माथेफिरू युवकास आटोक्यात घेण्यासाठी युद्ध पातळीवर नागरिकांना कसरत करावी लागली अखेर त्याला पकडण्यात यश आले सरते शेवटी त्याला पोलीस स्टेशन येथे काठीवर दोरीने बांधून उचलून नागरिकांनी केले पोलिसांच्या स्वाधीन. त्याचा थरार पाहून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
चिक्या उर्फ मत्या उर्फ प्रथमेश गजानन लाडके वय (२०) वर्ष रा. नेताजी वार्ड असे सलग दोन वृद्ध इसमाचा खून करणाऱ्या माथे फिरू युवकाचे नाव आहे. आज दिनांक २१ जानेवारी २०२६ ला सकाळी ९ वाजता दरम्यान या युवकाने वेगवेगळ्या चार ठिकाणी मारहाणीच्या घटना घडवून आणल्या. यात सर्वप्रथम आरोपी चिक्याने आजी सोबत भांडण केले. नंतर त्याच्या घरासमोर बजाज फायनान्स कंपनीच्या कर्मचारी अभी मोरे यास मारहाण केली आणि दुचाकीचेही नुकसान केले.यात त्याने आपली सुटका कशीबशी करून घेतली आणि तिथून पळ काढला. त्या मनोरुग्ण माथेफेरुणे गर्दीतील दहा वर्षाचा करण गणेश शेंडे मुलाचा गळा आवळून मारण्याचा प्रयत्न करीत असताना या सैतानरुपी मनोरुग्णा कडून मुलाची सुटका करन्याकरिता मोठ्या धाडसाने व हिंमतीने गौरव रमेश राऊत वय 16 वर्षाच्या मुलाने त्या मनोरुग्णाची लाथ पकडून ओढण्याचा प्रयत्न केला त्याच वेळेस अमर दिनेश राऊत,अविनाश पिटेकर आणि अन्य गर्दीतील लोक त्याच्या मदतीकरता धावून आले आणि त्याच्या तावडीतून त्या दहा वर्षाच्या मुलाचा जीव वाचविला. मनोरुग्णाच्या अफाट शक्ती पुढे त्याला पकडण्यासाठी कोणाची हिम्मत होत नव्हती. त्यावर त्या माथे फिरू मानसिक तंत्र बिघडलेल्या युवकांचा थरार थांबला नाही. घरातील बाजीचा गाथ घेऊन त्यांने आपला मोर्चा स्थानिक इंदिरा चौकाकडे वळविला. सर्वप्रथम त्याने खरकाटे मार्गाने इंदिरा चौकाकडे जात असलेले निरपराध वृद्ध इसम संजय रामकृष्ण राऊत वय 70 वर्ष रा. हनुमान वार्ड यांच्या डोक्यावर बाजीच्या गाथाचा प्रहार करून घटनास्थळी जीवानिशी ठार केले. तेवढ्यावर न थांबता चीक्याने त्याचा थरार सुरु ठेवला. त्यानंतर भाजीबाजारात दुकानात बसलेले निरपराध वृद्ध इसम रामराव महादेव वांगे वय (८५) महादेव वार्ड यांना भाजीमंडीतील दुकानात जावून त्याच बाजीच्या गाथाने डोक्यावर जबर मारहाण केली. यात वृद्ध रामाराव गंभीर जखमी झाले. त्यांना उपजिल्हा रुग्णाण्यात आणण्यात आले. प्रकृती गंभीर असल्यामुळे पुढील उपचाराकरिता त्यांना सेवाग्राम येथे पाठविण्यात आले मात्र त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. अश्याप्रकारे खुनाचा थरार करणाऱ्या चीक्याला पकडण्यासाठी जीवाची परवा नकरता ट्राफिक पोलीस प्रदीप खंडाळे व नागरिकांनी युद्ध पातळीवर प्रयत्न केले. यात वाहतूक पोलीस प्रदीप खंडाळे हे सुद्धा जखमी झाले. अखेर त्याला पकडण्यात नागरिकांना यश मिळाले. नागरिकांनी मनोरुग्न प्रथमेश उर्फ चिक्याला काठीला हात पाय दोरीने बांधून पोलीस स्टेशनाला नेवून पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटना स्थळ गाठले. तसेच फोरेन्सिक पथक पाचारण करण्यात आले. असून पुढील प्राथमिक तपास ठाणेदार सतीश देहनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस नीलम बाबर, पोलीस उपनिरीक्षक संतोष चव्हाण, जमादार बालाजी मस्के करीत आहे.

राजू डोंगरे साहसिक News-/24 आर्वी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!