उर्जा संवर्धनाचा उपक्रम प्रशंसनीय,कॅप्टन मोहन गुजरकर,यशवंत ‘उर्जा क्लब’ चा पुढाकार

0

वायगांव : आजच्या मशीनच्या व इंटरनेटच्या युगात उर्जेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. गरज नसताना उर्जेचा वापर कसा टाळता येईल, याकडे लक्ष वेधण्याची नितांत गरज असून या दृष्टिकोनातून स्थानिक यशवंत विद्यालयातील ‘उर्जा क्लब’ ने राबविलेला उर्जा संवर्धनाचा
उपक्रम प्रशंसनीय आहे, असे प्रतिपादन कॅप्टन मोहन गुजरकर यांनी नुकत्याच संपन्न झालेल्या बक्षिस वितरण कार्यक्रमात केले.उर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत ‘उर्जा क्लब’ शालेय व महाविद्यालयीन शिक्षणासोबत उर्जा संवर्धनाकरीता जनजागृतीपर विविध उपक्रम व स्पर्धेचे आयोजन उर्जा क्लबच्या शाळा समन्वयक अध्यापक अर्चना धानोरकर करीत असतात.या उपक्रमाचा एक भाग म्हणून यशवंत हायस्कूल च्या विद्यार्थ्यांकरिता विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.’उर्जा वाचवा’ या विषयावर ‘पोस्टर मेकिंग’ स्पर्धेत कु. हिना घोडे, आमिषा वाळके व अंजली नगराळे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार प्राप्त केले. निबंध स्पर्धेत कु. जिया राऊत, काशीश शिंदे व निकुंज वाळके यांनी तर ‘घोष वाक्य’ स्पर्धेत प्रगती हरणे, सलोनी नगराळे व गौरी भिसे यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची पुरस्कार प्राप्त केली.कार्यक्रमाचे संचालन यशवंत उर्जा क्लब समन्वयक अर्चना धानोरकर यांनी केले तर आभार रेवती ढगे हिने मानले.

        अविनाश नागदेवे सहासिक न्यूज-24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!