उशू खेळात चैतन्य देवतळे नी वाढवीला वर्धा जिल्ह्याचा मान.
वर्धा : राज्यस्तरीय शालेय उशू क्रीडा स्पर्धा , विभागीय क्रीडा संकुल अमरावती येथे, क्रीडा संचनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत दिनांक 27 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वर्धा येथील वर्ग 10 चा विध्यार्थी चैतन्य मंगेश देवतळे विभागीय विजेता याने नागपूर विभागाचे शालेय उशू खेळासाठी प्रतिनिधित्व केले. पहिली फेरी मुंबई सोबत जिंकला व सेमी फायनल फेरीत कोल्हापूर सोबत जिंकून अंतिम फेरी पुणे सोबत खेळून उपविजेता ठरला. पुणे ला गोल्ड मेडल तर वर्धा च्या चैतन्य मंगेश देवतळे वयोगट 17 व 45 kg गटात सिल्वर मेडल उपस्थित मान्यवरांचे हस्ते प्रदान करण्यात आले.त्याचे विद्यालयात मा.भरत वणझरा अध्यक्ष व विनायक होले,सचिव,तसेच समस्त पदाधिकारी हुतात्मा स्मारक समिती आष्टी (शहीद ) , मा. प्रशांत ठाकरे, माजी सरपंच, सुजातपूर,विनय बुरघाटे, मुख्याध्यापक, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालय, प्रतापनगर, वर्धा,अजय उमरकर, उपमुख्याध्यापक, हुतात्मा राष्ट्रीय विद्यालय, आष्टी, जेष्ठ शिक्षक पुंडलिक नागतोडे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.वर्धा तालुका क्रीडा संयोजक, उशू खेळाचे मार्गदर्शक निलेश राऊत, भोंगडे सर, पालक मंगेश देवतळे , क्रीडा शिक्षक. प्रल्हाद बिडकर यांनी त्याला मार्गदर्शन व मोलाचे सहकार्य केले.दीपाली मालपे, अश्विनी थोटे, वैशाली चिव्हाणे, संतोष सटोटे, विनोद बोंबले, गजानन मडावी सर्व शिक्षक वृंदानी अभिनंदन केले.
सहासिक न्यूज-24 वर्धा