एकतर्फी प्रेमातून २३ वर्षीय युवतीची घरी चाकूने वार करीत हत्या.
🔥 दहेगाव गोसावी येथील घटना, 🔥 घरातून बोलवून केला हल्ला, 🔥 हल्लेखोरात दोन युवक, दोन युवतीचा समावेश.
सिंदी (रेल्वे) : सेलू तालुक्यातील दहेगाव गोसावी येथील रहिवासी अंकीता सतीश बिईलबोडे या २३ वर्षीय युवतीचे घरी जाऊन दोन दुचाकी वाहनाने आलेल्या चार जणांनी चाकूने वार करीत हत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी ९ वाजताचे दरम्यान घडली.घटनेनंतर दुचाकी वाहनाने या चौघांनी तेथून जुनोना गावकडे पळ काढला.पण, ग्रामस्थांनी त्यांचा पाठलाग करीत त्यांना पकडून पोलीसांच्या ताब्यात दिले.यात दोन युवक व दोन युवतीचा समावेश आहे.या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली ग्रामस्थांनी पोलीस स्टेशन वर धावा करीत आपला रोष व्यक्त केला.या घटनेनंतर गावातील वातावरण पाहता पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी गावाला भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घेतली
घटनेच्या दिवशी सायंकाळी अंकीता तिची आई,आणि आजी हे घरीच टिव्ही पाहत बसले होत्या. वडील घराचे मागील बाजूस दाराकडे बसून होते.कुणीतरी घराचे फाटक ठोठावल्याचा आवाज आल्याने अंकीता ही कोण आले म्हणून बाहेर बघण्यासाठी निघाली.तेव्हा दोन दुचाकीने आलेल्या या चौघापैकी एकाने अंकीताचे मानेवर चाकूचे वार केले.दुसरा सहकारी मार तिला म्हणून ओरडत होता.यामुळे लगेच आई व आजी बाहेर निघाली व अंकीतास जखमी अवस्थेत घरात आणले. त्यांना पाहताच या चौघांनी तेथून पळ काढला.जखमी अंकीताला शेजारच्या लोकांचे मदतीने तातडीने सेवाग्राम रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.इकडे गावातील काहीनी जुनोना मार्गे पळालेल्या या चौघांचा पाठलाग करून त्यांना पकडून पोलीसांचे हवाली केले.अंकीताचा मृत्यू झाल्याची बातमी येताच संतप्त ग्रामस्थांनी पोलीस स्टेशन वर धावा करीत आपला रोष व्यक्त केला. गुन्हेगार कशाला घाबरत नाही बाहेर काय गावात घरातही मुली सुरक्षित नाही,अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकाना तात्काळ फाशी देण्यात यावी,अशी मागणी केली जात आहे. या घटनेमुळे गावात निर्माण झालेले तणावाचे वातावरण पाहता वरीष्ठ पोलीस अधिकारी गावात दाखल झाले.
मृतक अंकीता ही बोरगाव मेघे येथे ब्युटी पार्लरचा कोर्स करीत होती. ती रेल्वेने ये जा करीत होती. नालवाडी येथे राहणारा लक्की अनिल जगताप हा नेहमीच अंकीताला फोनवरून त्रास देत जिवे मारण्याची धमकी देत होता.बैलपोळ्यानंतर तिला असाच फोन करून त्याने धमकी दिली.तिचे भावालाही त्याने धमकी दिल्याने भितीपोटी या कुटुबिंयानी पोलीसात तक्रार दाखल केली नाही.लक्की हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून तो यवतमाळ येथील रहिवासी आहे.त्याचेवर तिथे गुन्हे दाखल असल्याने तो नालवाडी येथे राहण्यास आला अशी माहिती आहे. त्याचे गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे हे कुटुंब दहशतीत होते.या घटनेमुळे या युवतीचा जिव गेला असून आजही ते कुटुंब दहशतीत आहे.आपल्या सहकारी मित्रासह दोन युवतींनी घरी येऊन केलेला हा हल्ला निश्चितच कायदा तसेच शासकीय यंत्रणा कुठेतरी कमी पडत असल्याचे दिसून येत आहे.या घटनेमुळे जनमानसात कमालीचा अंसतोष निर्माण झाला असून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहे.सध्या हे चारही आरोपी पोलीसांचे ताब्यात असून पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनात दहेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश कामाले व त्यांचे सहकारी या घटनेचा तपास करीत आहे.यातील सत्यता काय ते तपासाअंती उघडकीस येईल.
हिंगणघाटचे घटनेची पुनरावृत्ती
हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून प्राध्यापिका असलेल्या अंकीताला पेटवून देत तिची हत्या करण्यात आली होती.येथेही त्याच घटनेची पुनरावृत्ती झाल्याचे दिसून येत असून या मृत मुलीचे नाव अंकीता आहे दोनही अंकीतासोबत चढलेली घटना समाजमन हेलावून टाकणारी आहे.
दिनेश घोडमारे सहासिक न्यूज -24