एका रुपयात पीक विमाच्या नावावर शेतकऱ्यांची शासनाने केली फसवणूक….
एक रुपयात काढण्यात आलेल्या पीक विम्याचा लाभ शेतकऱ्यांना तात्काळ न दिल्यास तीव्र आंदोलन-करु,अतुल वांदिले यांचा ईशारा…
वर्धा जिल्हयात अनेक शेतकरी पीक विम्याचा लाभा पासून वंचित…
जिल्हयात अडीच लाखा पेक्षा जास्त शेतकर्यांनी काढला प्रधानमंत्री पीक विमा..
राष्ट्रवादीचे अतुल वांदिले यांच्या परिवर्तन यात्रेदरम्यानचा शेतकऱ्यांनी माडली आपली व्यथा
परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून १७ दिवसात १६२ गावांना अतूल वांदीले यांनी दिली भेट…
हिंगणघाट : समुद्रपूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची परिवर्तन जनसवांद यात्रा पोहना येथून २० नोव्हेंबरला प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात निघाली असून समुद्रपूर तालुक्यात या यात्रेचे आगमन झाले आहे.१७ दिवसात परिवर्तन यात्रेने १६२ गावांना भेट दिली असून शेतकऱ्याच्या समस्या जाणून त्यांच्याशी संवाद साधण्यात येत आहे. समुद्रपूर येथे परिवर्तन यात्रेची सभा झेंडा चौक येथे पार पडली या सभेत राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले बोलत असताना सरकारने शेतकऱ्यांची पिक विमा च्या नावावर फसवणूक केल्या असल्याचे मत अतुल वांदिले यांनी व्यक्त केले.प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत एक रुपयांमध्ये पिक विमा सरकारने शेतकऱ्याकडून काढून घेतला आहे. जिल्ह्यात अडीच लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी पिक विमा काढलेला असून आता पर्यंत शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभ मिळाला नसून अनेक शेतकरी लाभाच्या प्रतीक्षेत आहे. शेतकऱ्यांना याचा लाभ तात्काळ मिळाला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तीव्र आंदोलन करेल व नंतर जे काही प्रतिसाद उमटेल त्यांचे सर्व जबाबदार शासन आणि प्रशासन यांची राहील असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी दिला आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस किशोर माथनकर, तालुका अध्यक्ष महेश झोटिंग पाटील, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष धनराज तेलंग,जिल्हा कार्याध्यक्ष प्रलय तेलंग, ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे,जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे,जिल्हा सरचिटणीस विनोद पांडे,जिल्हा उपाध्यक्ष संदीप भांडवलकर,अमोल बोरकर, राजेशजी धोटे, सुनील भुते,जावेद मिर्झा, नदीम भाई,अशोक डगवार,राजू मेसेकर, सोनू मेश्राम,ललित डगवार, संदीप उईके, सुभाष चौधरी,प्रा गोकुळ टिपले, शक्ती गेडाम, तुषार थुटे, सीमा तिवारी, सुजाता जांबुळकर, सविता गिरी, अर्चना नांदुरकर,विद्या गिरी, रंगारीताई वकीलताई, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…
ईकबाल पहेलवान साहसिक न्यूज-24