कर्जबाजारी शेतकऱ्याने केली गळफास लावून आत्महत्या.

0

 

     शेतकरी मृतक संजय घोडे 

देवळी : शेतकरी संजय देवरावजी घोडे वय ४६ वर्ष रा. कुरडकर पुरा वॉर्ड क्रमांक १२ देवळी या कर्जबाजारी शेतकऱ्याने बुधवारी संध्याकाळी आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.प्राप्त माहितीनुसार संजय हा एकपाळा परिसरातील वडिलोपार्जित असलेली शेती करीत होता त्याने शेतीसाठी बँकेकडून एक लाख रुपये कर्ज घेतले होते तसेच गावातील काही लोकांकडून सुद्धा शेतीसाठी त्याने कर्ज घेतले होते परंतु यावर्षी शेतीमध्ये नापिकी झाल्याने तो सारखा अस्वस्थ राहत होता कर्जबाजारी झाल्यामुळे त्याने आत्महत्या केली असे त्याच्या परिवारातील सदस्याचे म्हणणे आहे. त्याच्या मागे दोन मुली पत्नी आई वडील असा आप्त परिवार आहे.

सागर झोरे साहसिक न्यूज-24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!