काचनूर येथे मुलाकडून आईची हत्या…

0

 अनैतिक संबंधाला आईने विरोध केल्याने हत्या, डोक्यात वरवंटा मारून हत्या.

आर्वी :  तालुक्याच्या काचनूर येथे मुलाने आईची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली.शुक्रवारी २ फेब्रुवारी रोजीच्या पहाटेच्या सुमारास ही घटना पुढे आली. याप्रकरणी पोलिसांनी खरांगणा (मोरांगणा) पोलिसांनी गुन्हा दाखल करत मुलाला ताब्यात घेतले. मुलाच्या बाहेरील अनैतिक संबंधाला विरोध केल्यामुळे मुलाने आईची हत्या केल्याची माहिती यात पुढे येत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव मीराबाई मुरलीधर पुसदकर (वय ५५) वर्ष रा. काचनूर असे आहे. आईने मुलाला त्याच्या अनैतिक संबंधास विरोध केला. त्यावरून आरोपी मुलगा सोपान मुरलीधर पुसदकर (वय३२) याने आई मीराबाई यांच्यासोबत वाद घातला. वादातून त्याने आईच्या डोक्यात वरवंटा घातला. त्यात गंभीर जखमी मीराबाई यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस पाटील उमेश अंबोरे यांनी खरांगणा पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी लागलीच घटनास्थळ गाठले. ठाणेदार सदाशिव ढाकणे यांनी सहायक पोलिस निरीक्षक विनोद सानप, धीरज मिसाळ, विठ्ठल केंद्रे, मनीष वैद्य, श्यामराव इवनाते, वसंत पिसे, अमोल इंगोले, प्रतिभा पेंदाम, योगेश्री उके यांनी घटनास्थळ गाठत पंचनामा करून चौकशी केली. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी खंडेराव, आयपीएस अधिकारी सृष्टी जैन यांनी भेट दिली. घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. फॉरेन्सिक पथकाचे अनिल साटोणे यांच्यासह चमुलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी खरांगणा (मोरांगणा) पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अधीक्षक नुरूल हसन यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सदशिव ढाकणे प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
— याप्रकरणी आरोपी मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. वरंवट्याने त्याने हत्या केली. पुढील तपास सुरू आहे, असे ठाणेदार सदाशिव ढाकणे यांनी सांगितले.

        क्रमश

गजेंद्र डोंगरे साहसिक न्यूज/24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!