वर्धा,देवळी -/ तालुक्यातील काजळसरा येथे १५ एप्रिल रोजी घडलेल्या कथित हिंसाचार प्रकरणात न्याय मिळावा, दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि भीम सैनिकांवर झालेल्या अन्यायाचा निषेध म्हणून आज वर्ध्यात गांधी पुतळा, सिव्हिल लाईन येथे भीम आर्मी (भारत एकता मिशन) व विविध आंबेडकरी संघटनांच्या वतीने धरणे आंदोलन सुरू करण्यात आले.
भीम आर्मी जिल्हाध्यक्ष प्रदीप कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या आंदोलनात काजलसरा गावातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, युवक व विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. आंदोलनस्थळी घोषणाबाजी करत प्रशासनाच्या भूमिकेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
भीम आर्मी चे जिल्हा संघटक आशीष सलोड़कर यांचा आरोप आहे की, काजलसरा प्रकरणी वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. त्यामुळे पीडितांना न्याय मिळत नसल्याची भावना निर्माण झाली असून जनतेमध्ये संतापाचे वातावरण आहे.
प्रसिद्धि प्रमुख भीम आर्मी तुषार पाटिल यानी लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई, संबंधित आरोपींना तात्काळ अटक, गावकऱ्यांवरील कथित खोटे गुन्हे मागे घेणे, नागरिकांना संरक्षण देणे व संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.
“न्याय मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही,” असा इशारा भीम आर्मीच्च्या कार्यकर्त्यानी दिला असून प्रशासनाने त्वरीत दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्यात या आंदोलनाची चर्चा सुरू असून प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(क्रमशः) (पुढल्या भागात बघा सविस्तर फोटो व्हिडीओ सहित News बघत राहा ब्युरो रिपोर्ट साहसिक News-24 वर्धा -देवळी )