किन्हाळा इंदिरा नगर च्या पाण्याच्या टाकीचे थांबलेले काम त्वरित सुरु करा,आ.कुणावार यांना निवेदनातून मागणी
बेलदार समाजाच्या जातीच्या दाखल्याचा प्रश्न विधानसभेत मांडण्यात यावा
सहासिक न्यूज-24/वर्धा
किन्हाळा इंदिरा नगर ता.सेलू जी वर्धा येथील ग्रामपंचायत दहेगाव गोसावी येथील उदघाटन २४ फेब्रुवारी २०२३ रोजी करण्यात आले होते.त्यांनतर पानाच्या टाकीचे बांधकाम करण्याचे काम ठेकेदार सुशील माहुरे यांना देऊन बांधकामचे काम मात्र सुरु केले होते परंतु सहा महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी ही पिणाच्या टाकीचे काम मात्र अजूनही पूर्ण झाले नाही तसेच या कामाचे स्वरूप खूप घिमे गतीने सुरु आहे,वीस-वीस फुटाचे चार तक्ता सुद्धा उभे केले असून काही तर तक्ते तडकलेल्या अवस्थेत सुद्धा आहे अशातच संतापलेल्या ग्रामस्थांनी १२ सप्टेंबर रोजी आमदार समीर कुणावार यांची भेट घेऊन या पाण्यांच्या टांकीचे कामा बद्धल संपूर्ण माहिती देऊन त्वरित पाणी पुरवठ्याच्या टाकीचे काम पूर्ण करावे बेलदार (ओड)भटका समाज यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
तसेच दहेगाव (गो) ते केळझर रस्त्याची दुरावस्था झाली आहे तरी नागरिकांना त्रास सहन करा लागत आहेत तरी या रोड चे काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावेत
तसेच बेलदार ओड भटका समाजांच्या जातिच्या दाखल्याचा प्रश्न विधानसभेत मांडण्यात यावा,यावेळी अनिल ह.चव्हाण बेलदार ओड भटका समाज वर्धा जिल्हा अध्यक्ष,लखन जाधव,मिथुन चव्हाण,महादेव जाधव,लहू पवार,गणेश जाधव,सुनील पवार अनिल पवार,विशाल पवार,शिवलाल मोहिते,मनोहर पवार,अशोक पवार, अमोल पीढाले,अनीता चव्हाण शोभा चव्हाण,सीता जाधव सुनीता फाये् पंचफूला मोहिते,सुशील पवार ललिता जाधव ,रेशम चव्हाण लीला चव्हाण साखर मोहिते,शशिकला यूनाते,उष्षा ताकसंडे रेखा फाये आदींच्या उपस्थित निवेदन देण्यात आले.