कृषी निविष्ठा विक्रेतांचा तिन दिवस कडकडीत बंद.
हिंगणघाट : समुद्रपूर तालुका कृषी व्यवसाय संघातर्फे प्रस्तावित जाचक कृषी विधेयके रद्द करण्याच्या मागणीसाठी तिन दिवस कडकडीत बंद पाळण्यात आला.या राज्यव्यापी तीन दिवसीय कडकडीत बंदला हिंगणघाट व समूद्रपूर तालुक्यातील कृषी व्यावसायीकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.बोगस आणि बनावट कृषी निविष्ठांची विक्री रोखण्यासाठी राज्य सरकारने आणलेले प्रस्तावित कायदे हे संशोधनासाठी विधिमंडळाच्या संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठविले आहेत. या समितीची दिवाळीनंतर अंतिम बैठक होऊन संशोधित विधेयक हिवाळी अधिवेशनातच मांडण्यात येईल असे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी जाहीर केले आहे.ही विधेयके कृषी व्यवसायीकांकरीता घातक असल्याने ही प्रस्तावित विधेयके लागू करण्यात येऊ नये अशी मागणी राज्यातील कृषी व्यावसायीकांद्वारे करण्यात आली. परंतु यावर तोडगा न निघाल्यामुळे तीन दिवसीय कडकडीत बंद कृषी व्यावसायीकांनी पुकारला आहे व मार्ग न निघाल्यास बेमुदत बंद पुकारण्यात येईल असाही शासनाला ईशारा देण्यात आला आहे.या पाच विधेयकात दुय्यम दर्जाचे अप्रमाणीत बियाणे,खते,किटकनाशके याच्या वापरामुळे झालेल्या नुकसाणीकरीता भरपाई विधेयक क्र. ४० ते ४४ या विरोधात कृषी विक्रेत्यांनी राज्य पातळीवर बंद पुकारला व सर्व विक्रेते सहभागी झाले. हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यातील सर्व कृषी संचालकांनी बंदला उत्स्पुर्त सहभाग दिला.कृषी निविष्ठांमध्ये खत,बि बियाणे व किटकनाशक यांचा समावेश होतो.शासनाकडुन मान्यताप्राप्त उत्पादक कंपनीकडुन आलेले सिलबंद कृषी निविष्ठांची विक्री शासनाकडुन मान्यताप्राप्त असलेल्या कृषी व्यावसायीकांकडुन विक्री केल्या जाते.म्हणजेच कृषी व्यावसायीक हा शासन मान्यताप्राप्त उत्पादक कंपनी व शेतकरी यांच्या मधील दुवा आहे.कृषी व्यावसायीक हे स्वतः उत्पादक नाहीत. उत्पादक कंपनी कडुन जी प्रमाणित सिलबंद कृषी निविष्ठा आहे ती ठरलेल्या दरात शेतकर्यांना देणे हेच काम कृषी व्यावसाइकांचे असतांना व ते अप्रमाणीत खुल्या कृषी निविष्ठांची विक्री करीत नसतांना कंपनी व शासन द्वारा प्रमाणित कृषी निविष्ठा बोगस निघाल्यास त्यांच्यावर पोटा सारखे कडक फौजदारी गुन्हे लादण्याचा प्रकार हा अन्यायकारक असल्याचे कृषी व्यावसायीकांचे म्हनणे आहे.त्यातुनच हा बंदचा प्रकार संपुर्ण राज्यात घडला असुन हे जाचक कायदे लागु केल्यास तिव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा हिंगणघाट समुद्रपूर कृषी व्यवसाय संघाचे अध्यक्ष कमल मानधनाया यांनी दिला आहे.या संदर्भात तहसिलदार सतिश मासाळ यांना निवेदन देण्यात आले.यावेळी हिंगणघाट समुद्रपूर तालुका कृषी व्यवसायी संघाचे अध्यक्ष कमल मानधनिया,सचिव श्रीकांत महाबुधे,सह सचिव नरेश खाडे,कोषाध्यक्ष नारायन करवा,वरिष्ठ सदस्य राजु राठी,बबन कोचर,उदय चोरडिया, संजय बोथरा(पोहणा),सारंग गुळघाणे(मांडगाव),किरण येणोरकर(लाडकी)यांची उपस्थिती होती.बंदमुळे शेतकरी अडचणीत(ब्लॉक)सध्या रब्बी पिक लागवडीचा हंगाम जोरात सुरु आहे.हरबरा व गहु पिकाच्या लागवडीची शेतकर्यांची लगबग सुरु आहे.त्यासाठी खते व बियाणे घेण्यासाठी शेतकर्यांची कृषी केंद्रावर धाव सुरु असतांनाच अचानक हा लागोपाठ तिन दिवसिय बंद आल्याने शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला.
ईकबाल पहेलवान सहासिक न्यूज-24