केंद्रीय पंचायत राज्य मंत्री यांचे हस्ते सरीता गाखरे यांचा कार्यक्षम अध्यक्ष म्हणून पुरस्कार

0

प्रतिनिधी/ वर्धा :

जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य असोसिएशनच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून अण्णाभाऊ साठे सभागृह, पुणे येथे दि.०७.०३.२०२२ रोजी राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यांत आले होते. या असोसिएशनच्या पदाधिका-यांनी सर्व जिप व पंस मधील पदाधिकारी व सदस्य यांचे कामाचा परामर्श घेवून प्रस्ताव मागविले होते, प्रत्येकांच्या प्रभावी कामांची चाचपणी करून जिल्हा परिषद मधील कार्यक्षम अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, सदस्य यांची पुरस्कारासाठी निवड केली. राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे मधून प्रभावी व कार्यक्षम अध्यक्ष म्हणून वर्धा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सरीता विजय गाखरे यांची प्रथम क्रमांकाच्या पुरस्कारासाठी निवड झाली.
या राज्यस्तरीय पुरस्कार सोळयामध्ये वर्धा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सरीता गाखरे यांना कार्यक्षम अध्यक्ष म्हणून केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरविण्यांत आले, या पुरस्काराचेवेळी असोसीएशनचे संस्थापक अध्यक्ष कैलास गोरे-पाटील, अध्यक्ष निवड समिती शरद बुटटे पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष उदय बने, प्रदेश सरचिटणीस सुभाष घरत, राज्य उपाध्यक्ष जय मंगल जाधव व प्रतापराव पाटील, सुभाष पाटील, सुभाष पवार, प्रदेश कार्याध्यक्ष अमृता पवार, सौ अंवतिका लेकुरपालके, सौ रेखा कंटे, प्रमोद काकडे, डॉ निलम पाटील, शिवाजी मोरे, शिक्षण व आरोग्य सभापती मृणाल माटे व इतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती व सदस्य उपस्थित होते.
ग्रामीण भागाला विकासाच्या प्रक्रियेत पुढे नेताना ग्रामपंचायती बरोबरच जिल्हा परिषद व पंचायत समिती यांचा अतिशय महत्वाचा वाटा आहे. या पंचायत राज संस्थाचे काम अधिक लोकाभिमुख करण्याचे काम या संस्थाचे सदस्य करीत असतात. आपल्या राज्यामध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद या त्रीस्तरीय पंचायत राज संस्था आणि या संस्थामधील सरपंच, ग्रामसेवक व कर्मचारी यांचे कामांचा सन्मान करणा-या योजना राबविल्या जातात, परंतु जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या विशेष कामगिरीची व योगदानाची नोंद घेण्याची कोणतीही व्यवस्था नाही, या सर्व बाबीची दखल घेवूनच जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य असोसिएशन संघटना स्थापन करण्यांत आली आणि या दुर्लक्षित लोकप्रतिनिधींच्या प्रभावी कामगिरींनी नोंद घेण्यासाठी असोसिएशन हे एक मोठे व्यासपिठ महाराष्ट्रात तयार झाले ही एक आपल्या सर्वासाठी मोठी उपलब्धी आहे. या व्यासपिठाचे माध्यमातून अनेक प्रलंबित विषय शासन दरबारी रेटून मार्गी लावता येतील व ग्रामीण भागातील विकास कामांना पुरेसा निधी मिळवून घेता येईल आणि त्यातून मागास असलेल्या गावांचा ख-या अर्थाने विकास करता येवू शकेल असे मत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सरीता गाखरे यांनी पुरस्कार स्विकारतांना व्यक्त केले.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सरीता गाखरे यांनी अध्यक्ष म्हणून कामकाज करतांना जिल्हा परिषदेच्या प्रशासनामध्ये स्वतःची एक वेगळी छाप निर्माण करण्यास यशस्वी ठरल्या. महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी मागिल दोन वर्षात महिलासाठी विविध उपक्रम राबविलेत. कोरोना संकट काळात तसेच विविध आव्हानांना सामोरे जात आत्मविश्वासाच्या बळावर जे अशक्य आहे ते शक्य करून दाखवत अनेक क्षेत्रात आपल्या कतृत्वाचा ठसा उमटविणा-या सरीता गाखरे यांना जागतिक महिला दिनी वर्धा जिल्हयातील जनतेकडून सलाम!
जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य असोसिएशनच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सरीता गाखरे यांना कार्यक्षम अध्यक्ष म्हणून मिळालेला राज्यस्तरीय पुरस्कार निश्चितच वर्धा जिल्हयासाठी भुषणावह व अभिमानाची बाब आहे, या मिळालेल्या पुरस्काराबाबत सर्व स्तरावरून तसेच जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी वृंदाकडून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!