कोब्रा सापाला सर्पमित्र कुमार साठे यांनी दिले जीवनदान.
🔥 काटोले दाम्पत्यांनी मानले सर्पमित्र साठे यांचे आभार
सिंदी (रेल्वे) : येथील वार्ड क्रमांक 16 मध्ये घरातील वरांड्यात बसून दहशत निर्माण करणाऱ्या विषारी कोब्रा जातीच्या सापाला सर्पमित्रांनी सुरक्षितरित्या पकडून जंगलात सोडून देत जीवदान दिले. रामराव काटोले यांच्या घरातील वरांड्यात दडून बसून दहशत निर्माण करणाऱ्या विषारी कोब्रा जातीच्या सापाला बुधवारी 15 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सर्पमित्रानी पकडून जीवदान दिले व जीव मुठीत धरुन बसलेल्या घरातील कुटुंबातील सदस्यांनी सुटकेचा निःश्वास घेतला.
बुधवारी सायंकाळी शोभा प्रकाश दिवटे या महिला वार्डात फेरफटका मारत असतांना त्यांना रस्त्यावर भुते यांच्या घराच्या भिंतीलगत एक मोठा साफ येतांना दिसला. त्यामुळे दिवटे यांनी लगेच आरडाओरड करून वार्डातील नागरिकांना बाहेर बोलविले. दरम्यान, तो विषारी साप रामराव काटोले यांच्या घरातील वरांड्यात एका डसबिनच्या पाठीमागे जाऊन दडून बसला होता. ही बाब कुटुंबियांच्या निर्दशनास येतात काटोले यांच्या घरात तसेच शेजारी राहणाऱ्या नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले. यासंबंधी उपस्थित नागरिकांनी तात्काळ सर्पमित्र कुमार साठे यांना फोन करून घटनेची माहिती दिली. अवघ्या 15 मिनिटात सर्पमित्र साठे हे घटनास्थळी दाखल झाले. सर्पमित्रानी या सापाला मोठ्या सिताफीने पकडून प्लॅस्टिकच्या भरणीमध्ये जेरबंद करताच काटोले दाम्पत्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. त्यामुळे या विषारी सापाला पकडून जेरबंद केल्याने काटोले दाम्पत्यांनी सर्पमित्र कुमार साठे यांचे आभार मानले आहे.
यावेळी या सापाला बघण्यासाठी वार्डातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. काटोले यांच्या घरी कोब्रा जातीचा साप निघाल्याने काहीवेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सर्पमित्र कुमार साठे यांनी या कोब्रा जातीच्या सापाला त्याचवेळी सायंकाळी 11 वाजता केळझर येथील जंगलात सोडून दिले.
दिनेश घोडमारे साहसिक न्यूज-24