कोरोना विरुद्धच्या लढाईत परिचारीकेंचे योगदान महत्वाचे – खासदार रामदास तडस
साहसिक न्युज 24
प्रतिनिधी / देवळी :
वैद्यकीय क्षेत्रात अखंड सेवाव्रत स्वीकारून राबणाऱ-या, रुग्णांच्या वेदनेवर फुंकर घालण्याचे काम करणा-या परिचारिकांचे कार्य महत्वाचे आहे, देषातील सर्व परिचारीका रूग्ण सेवा हीच ईश्वर सेवा समजून सेवाभावी वृत्तीने रात्रदिवस जनसेवा करीत आहे, कोविड काळात आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा करणा-या त्याग व समर्पण वृत्तीला माझा सलाम, तसेच कोरोना विरुद्धच्या लढाईत त्यांनी दिलेले योगदान महत्वाचे आहे, त्यांचे हे योगदान सर्वांच्या कायम स्मरणात राहील असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले व सर्व परिचारिका भगिनींना जागतिक परिचारिका दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
आज देवळी येथे जागतिक परिचारीका दिनानिमीत्य खासदार रामदास तडस यांनी सर्व परिचारीकांना शुभेच्छा दिल्या, यावेळी ग्रामीण रुग्णालय देवळी येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर आशिष लांडे, माजी उपाध्यक्ष डॅा. नरेन्द्र मदनकर, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नेहा फुलझेले, डॉक्टर विवेक कचूरे, इन्चार्ज सिस्टर श्रीमती इंगोले, सिस्टर श्रीमती सिताफळे, सिस्टर सिस्टर श्रीमती पाटील, दषरथ भुजाडे व रुग्णालयातील इतर कर्मचारी उपस्थित होते.