कोळना (चोरे) ग्रामपंचायतच मधील ग्रामसेवकाचा मनमानी कारभार
साहसिक न्युज24
देवळी / प्रतिनिधी:
देवळी तालुक्यातील कोळना (चोरे) ग्रामपंचायत मध्ये दैनंदिन सुविधांचा असल्याचे दिसून येत आहे कोळना (चोरे)ग्रामपंचायत मध्ये रस्ते,नाल्या,पथदिवे,आणि चोहीकडे घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे त्यामुळे त्या गावातील नागरिक त्रस्त झाले आहे. पहिलेच या कोळना (चोरे)ग्रामपंचायत मध्ये मागील कित्येक महिन्यासापासून सचिवाची नियुक्ती करण्यात आली नव्हती आणि एक महिन्यापूर्वी या ग्रामपंचायत मध्ये स्वप्निल फाटे यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली परंतु त्यांनी १ महिन्यापासून कधीच ते कोळणा (चोरे) ग्रामपंचायत मध्ये आलेच नाही त्यामुळे गावातील लोकांच्या समस्या सतत वाढत आहे.या विषयी सरपंच ज्ञानेश्वर थोटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की ग्रामपंचायत मध्ये मागील एका महिन्यापासून सचिवच येत नाही त्यांना १-२ वेळा भेटून सांगितले तरी ते म्हणतात की माझ्याकडे २ ते ३ ग्रामपंचायत आहे तुमचे एकच गाव माझ्याकडे नाही आहे त्यामुळे माझे येणे होत नाही त्यामुळे त्यांच्या या अरेरावी पणाच्या धोरणामुळे ग्रामपंचायत विकासाचे काम गावात मिळणाऱ्या लोकांना मूलभूत सुविधा यापासून लोक वंचित राहत आहे ग्रामपंचायतीचे पूर्ण काम विस्कळीत झालेले आहे.असे त्यांचे म्हणणे आहे.
या विषयी गटविकास अधिकारी पंचायत समिती देवळी या कोळना चोरे गावाच्या समस्या कडे लक्ष देऊन संबंधित अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी विनंती गावातील नागरिक करीत आहे.