हिंगणघाट / शहरातील निशानपुरा वॉर्ड येथे दि.१९ रोजी कव्वालीच्या रंगारंग महामुकाबल्याचे आयोजन करण्यात आले.उपरोक्त कार्यक्रमात देशभरात गाजलेले कव्वाली कलाकार परविन सुलताना मुंबई व सलीम शहेजादा मुंबई, या दोघांमध्ये कव्वालीचा जबरदस्त मुकाबला झाला.या दोन्ही कलाकारांनी प्रेक्षकांना कव्वाली गजलच्या माध्यमातून मंत्रमुग्ध केले.उपरोक्त कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार राजूभाऊ तिमांडे , माजी नगराध्यक्ष पंढरीभाऊ कापसे,भाई अमन यवतमाळ, शैलेशजी अग्रवाल वर्धा, धनंजय बकाने , ठाणेदार मनोज गबने,जम्मूभाई वणी , मुन्ना बावा आर्वी, महेफुज कुरेशी आर्वी, सज्जु भाई आर्वी,अमोल बोरकर, बालाजी गहलोत, सलीम कुरेशी,अफजल भाई वर्धा, अब्बास भाई,पत्रकार,ईकबाल पहेलवान, श्याम ईडपवार,शेजवल भाई, यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला यशस्वीतेकरीता आयोजन समितीचे अध्यक्ष अमीन भाई, सचिव,अंकित ढगे, सदस्य,आसिफ फुलवाले,जुजर भारमल ,जावेद भाई, नासीर काका, नौशाद हुसैन , उमेर खान, माईक संचालन,शमीर दिलकश, व आभारप्रदर्शन एस कुमार झंनकार यांनी केले.