देवळी / येथे औद्योगिक वसाहती मधील एस एम डब्ल्यू इस्पात मध्ये क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते.या क्रीडा स्पर्धा मध्ये कंपनी व इतर कंपन्यातील कामगारांनी सहभाग घेतला होता.या क्रिकेट स्पर्धाचे उद्घाटन कंपनीचे मुख्याधिकारी तथा संचालक प्रतीक बिंदल प्लांट चे प्रमुख ब्रिजेश यादव,आतिश भट,श्याम सुंदर मुंदडा,रमेश नाथ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये क्रिकेट प्रिमीयर निग चे उद्घाटन झाले.उद्घाटन प्रसंगी कामगार खेळाडूंना मार्गदर्शन करताना संचालक प्रतीक बिंदल यांनी आपले मत व्यक्त करतांना सांगितले की कामगारांनी आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी व्यायाम,खेळ,क्रीडा स्पर्धा यामध्ये भाग घेणे गरजेचे आहे.यामुळे कामावरील ताण कमी होतो आणि आपले शरीर चांगले ठेवण्याकरिता मदत होते असे सांगितले.याप्रसंगी भाग घेतलेल्या कामगार खेळाडूंचा सन्मान करण्यात आला.या स्पर्धांमध्ये चंद्रपूर येथील ओमेट संघाचा सहभाग होता.अंतिम सामना एस एम एस वॉरियस वृद्ध सिक्युरिटी संघामध्ये झाला अंतिम विजेता संघ म्हणून एस एम एस व उपविजेता सिक्युरिटी संघ यांना बक्षीस देण्यात आले एस एन जे महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या क्रीडा स्पर्धांना प्राचार्य ढाले प्राध्यापक तथा कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.