खोटे दस्तावेज सादर करून प्लॉटची खरेदी..

0

देवळी पोलीस स्टेशन मध्ये चौघांवर गुन्हे दाखल.

खोटे दस्तावेज सादर करून संपत्ती हडपण्याच्या प्रकरणात वाढ.

देवळी : नागपूर येथील रहिवाशी किशोर पुरुषोत्तम खडगी यांच्या मालकी हक्काचा मौजा नाचणगाव येथे अकृषक निवासी प्लॉट होता सदर प्लॉट प्रेमचंद भानुदास मेश्राम रा.नागपूर यांनी प्लॉट धारकांचे आधार कार्ड पासवर्ड व खोट्या सईचा वापर करून सदर प्लॉटची विक्री आपल्या नावे करून घेतल्याचे उघडकीस आले आहे. प्लॉट धारक पुरुषोत्तम खडगी हे मृत्यू झाल्यावर सदर प्लॉट वारसान हक्काने करून घेण्याकरिता त्यांचा मुलगा किशोर पुरुषोत्तम खडगी तलाठ्याकडे गेल्यावर चौकशीमध्ये सदर प्लाट प्रेमचंद भानुदास मेश्राम यांचे नावे नोंदविण्यात आल्याचे लक्षात येताच किशोर खडगी यांनी संपूर्ण चौकशी व दस्तावेज व पुरावे गोळा करून देवळी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदविली.देवळी पोलिसांनी सदर प्रकरणावर चौकशी करून प्रेमचंद भानुदास मेश्राम रा.मार्डी तहसील तिवसा जिल्हा अमरावती,किशोर किसनाजी मुडे रा. रत्नापूर तहसील देवळी जिल्हा वर्धा, गौतम केदार अलोने रा. रत्नापूर तहसील देवळी जिल्हा वर्धा,आणि तोतया इसम रा. देवळी यांच्यावर चौकशी करून फसवणुकीचा व इतर कलमा गुन्हे अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे.घडलेले सदर प्रकरण पहिल्यांदाच नसून यापूर्वी सुद्धा येथील व इतर ठिकाणावर सुद्धा खोट्या विक्री करण्याचे प्रकरण चर्चेत आहे.पुलगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालय होत असलेल्या प्रकरणामुळे चर्चेत आहे. तोतया इसम याने मूळ प्लॉट मालक याचा आधार कार्डचा वापर करून प्रेमचंद भानुदास मेश्राम याने स्वतःच्या नावावर प्लॉट आपल्या नावावर करून किशोर पुरुषोत्तम खडगी मूळ प्लॉट धारक यांची फसवणूक केल्याचे चौकशीमध्ये निष्पन्न झालेले आहे. सदर प्रकरण पोलीस अधीक्षक वर्धा यांच्याकडे चौकशी अहवाल सादर केल्यावर चार आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आलेले असून यांना अटक होणे बाकी आहे. परंतु देवळी येथील रहिवाशी आरोपी क्रमांक चार तो तोतया इसम कोण?व सदर प्लॉटची विक्री लावणारा अर्जनविस कोण? याचा चौकशीमध्ये उल्लेख नसल्याने देवळी शहरांमध्ये नाव जाणून घेण्याकरिता उत्सुकतेने चर्चा सुरू आहे.तसेच तोतया याचे नाव काय सध्या देवळी शहरात चर्चेचा विषय आहे पोलिसांनी याचे नाव आणले का नाही हा ही एक देवळी शहरांमध्ये चर्चेचा विषय आहे.पुढील चौकशी देवळी पोलीस स्टेशन करीत आहे.

सागर झोरे साहसिक न्यूज/24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!