गळफास घेऊन तरुणाने संपविली जीवनयात्रा !
By साहसिक न्युज 24
मुक्ताईनगर /प्रतिनिधी
तालुक्यातील पिंप्री अकाराऊत येथील तरुणानेगळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना आज घडली आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील पिंप्री अकाराऊत येथील मंगेश निवृत्ती माळी (वय २२,
रा. पिंप्री अकाराऊत, ता.मुक्ताईनगर ) या तरूणाने राहता घरी छताच्या लोखंडी पाईपाला नायलॉनच्या
दोराने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज दुपारी एक वाजेच्या सुमारास त्याने गळफास घेतल्याची
माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेऊन त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याला
मृत घोषीत करण्यात आले.
मंगेश माळी याने नेमकी कोणत्या कारणाने आत्महत्या केली याची माहिती समोर आलेली नाही. या संदर्भात मुक्ताईनगर पोलीस स्थानकात त्याचे काका सुभाष
महादू माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकस्मात
मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.