गिरोली येथे चोरट्यांनी केला इसमाचा खून,चोरट्यांनी एक लाख,रुपये नगद पळविले देवळी पोलिसांचा अंदाज
मध्यरात्री झोपेतच केले ठार
सहासिक न्यूज-24
सागर झोरे/देवळी
देवळी तालुक्यातील गिरोली येथे मध्य रात्री दरम्यान अरुन किसन डहाके वय अंदाजे ६० वर्ष यांच्या घरी चोरी करण्यास आलेल्या चोरट्यांनी पंलगावर झोपून असलेला अरून किसन डहाके याला पावशी मारून झोपेतच ठार केले असल्याची घटना गिरोली गावात घडली.गिरोली येथिल अरुन किसन डहाके हा सदन शेतकरी असुन त्याचा मुलगा भाजी विक्रीचा व्यवसाय करतो त्यांच्याकडे रोख रक्कम आणि सोने दागिने असावे या अंदाजाने किवा या संदर्भात माहिती असावी या वरून चोरट्यांनी चोरी केली.यामध्ये अंदाजे एक लाख रुपये चोरट्यांनी पळविल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.ज्या खोलीत अरुण किसन डहाके झोपले होते.त्या खोलीत कपाट आहे.कपाटातील सामान अस्ताव्यस्थ दिसून आले.या वरून हा खून चोरी च्या माध्यमातून झाला असावा असा अंदाज आहे.
अरुन डहाके यांची पत्नी शोभा डहाके ही वर्धा येथे होती.मुलगा प्रविण व त्यांची पत्नी मुले दुसऱ्या खोलीमध्ये झोपले होते.मुतक अरुण चा नातु पहाटे पाच वाजता शौचालयात जाण्यासाठी उठला असता त्याला त्याचे आजोबा रक्त च्या भरोळ्यात दिसले.तसेच लगेच त्यानी त्यांच्या वडिला ला सांगितल्यावर त्यांनी पोलिस पाटील स्मीता थूल यांना बोलावले व लगेच पोलिस पाटील थूल यांनी देवळी पोलिस स्टेशनला या संदर्भात माहिती दिली.त्या नंतर देवळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार भानुदास पिदुरकर आपल्या दलासोबत घटनास्थळी दाखल झाले.असून पुढील तपास सुरु आहे रोख रक्कम एक लाख रुपये व सोन्याचे दागिने चोरी गेल्यांचे पोलिसांचा अंदाज आहे चोरट्यांचा अध्याप कोणताच सुगावा लागलेला नाही.गिरोली येथे पोलीस अधीक्षक नुरूल हसण यांनी घटनास्थळी भेट दिली व पुलगाव उपविभागीय संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार भानुदास पिदुरकर पुढील तपास करीत आहे.