आष्टी शहीद / अंतोरा येथे आजच्या या धावपळीच्या युगात कोणाला कोणाचे घेणे देणे नाही असं म्हटलं जातं पण अजूनही माणुसकी जिवंत आहे याच उदाहरण आज सकाळी पाहायला मिळालं सकाळी ९ च्या सुमारास शाळेच्या प्रगणामध्ये उंच(जवळपास ४० ते ५० फूट) अश्या शिसम च्या झाडावर एक तरुण चढतांना दिसला काल रात्री पासून एक बगडा पतंगीच्या धाग्यामध्ये अडकला होता. स्वतःची सुटका करण्यासाठी जीवाचा आटापिटा करत होता. कोणीतरी माझी मदत करेल अशा आशेने बघत होता.मात्र त्याला वाचविण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले मात्र कोणाला जमलेच नाही शेवटी राजीक शहा ने आपल्या जीवाची पर्वा न करता त्या उंच झाडावर चढून त्या पक्षाला खाली काढले त्याला पाणी पाजले त्यावर औषधोपचार केला आणी त्याला जीवदान देऊन बगळ्याची सुटका करण्यात आली.त्याने माणुसकीचे उदाहरण दिले या धरतीवर असणारा प्रत्येक जीव हा परमेश्वराची निर्मिती आहे त्याला आपण जपलं पाहिजे असं राजीक च मत आहे राजीक च्या साहस आणि माणुसकीला सलाम.नरेश भार्गव सहासिक न्यूज/24 शहीद आष्टी