आष्टी शहीद /आष्टी येथील कुंभार समाजाचे आद्य दैवत गोरोबा काका देवस्थानाच्या सभागृहाचे भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.या भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार दादाराव केचे तथा प्रमुख पाहुणे सुमित वानखडे भाजपा लोकसभा मतदारसंघ वर्धा प्रमुख, प्रमुख अतिथी रमजान अन्सारी भाजपा अल्पसंख्यांक , कमलाकर निंभोरकर आष्टी तालुका भाजपा अध्यक्ष,विनायक धोंगडी माजी सभापती पंचायत समिती आष्टी, राजा भातुकुलकर मंदिराचे संचालक, वसंतराव जवळेकर मंचावर उपस्थित होते. सर्वप्रथम मंदिराच्या सभागृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते पार पडले.
याप्रसंगी याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण कमलाकर निंभोरकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुमित वानखडे यांनी आपले मनोगत व्यक्त करत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात आम्ही काम करत असून राजकारणासोबत समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोचून समाजात राहून समाजकार्याच्या माध्यमातून समाज बांधवांसाठी काम करा. सोबतच मंदिर असो वा मज्जिद यांच्या विकासाकरिता शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून विकास कसा करता येईल यावर आपले मत व्यक्त केले.भूमिपूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार दादाराव केचे यांनी विधानसभा मतदारसंघातील मंदिर असो वा मज्जित या श्रद्धा संस्थांचा विकास होण्याकरिता शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून विकास घडवून आणू सोबतच शहराचा गाव खेड्यांचा विकास करण्याकरता निधी उपलब्ध करून देऊ तसेच गोरोबाकाका देवस्थान नाच्या सभागृहाच्या विकासाकरिता विशिष्ट नागरी सेवा व सुविधा योजनेतून २२-२३ अंतर्गत ४० लाखाचा मंजूर करून असे मत भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी मांडले.या कार्यक्रमाचे संचालन गुणवंत मानमोडे सर यांनी केले. तर आभार प्रदर्शन राजेंद्र भातकुलकर यांनी केले. याप्रसंगी शहरातील दयानंद हिरूडकर, अशोक विजयकर,भानदास ठाकरेअँड मनीष ठोंबरे,, वसंतराव ठाकरे, शंकरराव नागपुरे अँड.जयंत जाने, राजेश शिरभाते, नरेंद्र भनेरकर, सुनील सावळीकर, सुरेश गंध्रे, सुरेश गंध्रे सोनू भार्गव, बाबा मोकदम,,अजय लेकुरवाळे माजी नगरसेवक, सचिन गुप्ता, विजय खांडेकर, राजीव गंध्रे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.