ग्राऊंडवर सराव करणाऱ्या तरुणास कोच ने केली मारहाण
वर्धा /प्रतिनिधी :
वर्धा शहरातील स्टेडियम ग्राऊंडवर आज सकाळी 7:30वाजताच्या दरम्यान काही मुले सराव करते वेळी जखमी भूषण गायधने हासुद्धा ग्राऊंडवर अथेलॅक्टिसची प्रॅक्टिस करण्याकरिता ग्राऊंडवर होता. त्याचवेळेस काही लहान मुले त्याठिकाणी बॅडमिंटन खेळ खेळत होते. सराव करत असताना लहान मुले जखमी भूषणच्या मधात आल्याने त्यांना बाजूला केले. त्याठिकाणी असलेले कोच नितीन जाधव व वैभव तिजारे हे भुषणजवळ आले व तू लहान मुलाला बाजूला का केले. या कारणावरून दोन्ही कोचनी पुन्हा या ग्राऊंडवर दिसशील तर तुला मारून टाकीन अशी धमकीसुद्धा भूषणला दिली. लगेच पोलीस स्टेशन गाठून आरोपी विरुद्ध तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी कोच वैभव तिजारे व नितीन जाधव विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.