ग्रामपंचायत निवडणुक बंदोबस्त दरम्यान समुद्रपूर पोलीसांचे अवैध धंद्यांवर धडक कार्यवाही.

0

समुद्रपुर : ५ नोव्हेंबर रोजी ग्राम पंचायत निवडणुक बंदोबस्त दरम्यान दि. १ नोव्हेंबर पासून पोलीस स्टेशन समुद्रपूर चे ठाणेदार एस. बी. शेगांवकर यांचे मार्गदर्शनात डि.बी. पथकाचे पो.हवा. अरविंद येनुरकर, पो.ना. रवि पुरोहित, राजेश शेंडे, सचिन भारशंकर, पो.अ. वैभव चरडे यांनी पो.स्टे. समुद्रपूर परीसरात घाड सत्र राबवुन विविध ठिकाणी अवैध धंधे करणाऱ्या गुन्हेगारांवर कार्यवाही केली असुन, त्यांचेकडुन मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला. अवैधरित्या देशी व विदेशी दारूची वाहतुक व विक्री करणाऱ्या १० गुन्हेगारांवर दारूबंदी कायद्यान्वये व अवैध सट्टा जुगार व्यवसाय करणाऱ्या २ गुन्हेगारांवर जुगार कायद्यान्वये कार्यवाही करण्यात आली असून एक कार, चार मोटर सायकल व फिजसह एकुण किं. १३,८६,२५० रू. चा माल जप्त करण्यात आला. सदर कार्यवाहीमध्ये आरोपी नामे सुरज उर्फ गोलू पुरुषोत्तम साटोणे व शंकर विठ्ठल घाटाटे दोन्ही रा. टिळक वार्ड क ३ जान, तह. समुद्रपूर यांचेवर दारूबंदीबाबत प्रो.रेड कार्यवाही करून विदेशी दारू व फिज सह २७,८०० रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी नामे निशांत बाबाराव तुसे रा. शिवाजी वार्ड हिंगणघाट यावर प्रो.रेड कार्यवाही करून त्याचे ताब्यातुन विदेशी दारू व मोटर सायकल सह ९७,२०० रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी नामे दिनेश तेजमल रहेजा रा. सिंध्दी कॉलनी हिंगणघाट यावर प्रो.रेड कार्यवाही करून, त्याचे ताब्यातुन विदेशी दारू व मोटर सायकल ८३,६०० रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी नाने विक्की दिवाकर मसराम रा. वाघेडा तह समुद्रपूर व शुभम उर्फ पावर हेमराज ठवरे रा. वार्ड क २ समुद्रपूर यांचेवर प्रो. रेड कार्यवाही करून देशी दारू व मोटर सायकल सह ८८,००० रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी नामे अजय वामन हजारे, वैभव बारस्कर, प्रशांत उर्फ बंडु आंबटकर व मॉडर्न वाईन शॉप मालक चंद्रपुर यांच्यावर दारूबंदी कायद्यान्वये कार्यवाही करून मोठ्या प्रमाणात ३८ पेटी देशी दारू व ०३ पेटी विदेशी दारू अशा एकुण ४१ पेटी देशी-विदेशी दारू चा माल व कार असा ९,९७,८०० रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी नामे विजय बाबाराव धाडे व अखिल अनिल जांगळेकर दोन्ही रा. आंबेडकर वार्ड जाम यांचेवर जुगार कायद्यान्वये कार्यवाही करून, त्यांचे ताब्यातून ९२,०६० रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अशा विविध कार्यवाहीमध्ये एकुण १३,८६,२५० रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, अवैध धंदे करणाऱ्या गुन्हेगारांना पोलीसांचा भय निर्माण झालेला आहे. ग्राम पंचायत निवडणुक सर्वत्र शांततेत पार पडावी याकरीता समुद्रपूर पोलीस परीसरात नियमित पेट्रोलिंग करीत, गुन्हेगारांवर सतत कार्यवाही करून शांतता प्रस्थापित करण्याकरीता प्रयत्नशिल आहे.सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मा. नुरूल हसन सा, अपर पोलीस अधिक्षक मा. डॉ सागर कपडे सा. उपविभागीय पोलीस अधिकारी मा.  रोशन पंडित सा. यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन समुद्रपूरचे ठाणेदार स.पो.नि. एस.बी. शेगांवकर सा. यांचे निर्देशाप्रमाणे, स.फौ. विक्की मस्के, पो.हवा, अरविंद येनुरकर, पो.ना. रवि पुरोहित, राजेश शेंडे भारशंकर, पो.अं. वैभव चरडे यांनी केली.

ईकबाल पहेलवान सहासिक न्यूज-हिंगणघाट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!