ग्रामपंचायत शिरपूर येथे महाराष्ट्र दिन साजरा
देवळी / सागर झोरे:
देवळी तालुक्यातील शिरपूर ग्रामपंचायत कार्यालय येथील महाराष्ट्र दिन व कामगार दिन चे औचित्य साधून ग्रामपंचायत कार्यालय मध्ये ग्रामपंचायतचे सरपंच रवींद्र भांनारकर यांच्या हस्ते थोर महापुरुषाच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले.तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता शिरपूर येथील ग्रामवासी तसेच उपसरपंच राधाबाई लडके,ग्रामसेवक प्रवीण चव्हाण,पोलीस पाटील किरण होरे, तसेच ग्रामपंचायत सदस्य प्रणाली चौधरी,नीता जांभुळकर,सारिका महाडिक,निखिल गुल्हाने,व उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक जाधव सर,व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.