देवळी /तालुक्यातील चिकणी (जा) मराठी साहित्यातील महान कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त राज्यभरात मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात येतो याचेच औचित्य साधत जि.प. उच्च प्राथमिक शाळा चिकणी तथा आदर्श ग्राम समिती चिकणी यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी राजभाषा दिन चिकणी येथे साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी मराठीतील विविध कवींच्या कविता सादर करत मराठी भाषेच्या सौंदर्याचे प्रदर्शन मान्यवरांसमोर सादर केले. तसेच संपूर्ण गावातून ग्रंथ दिंडी मिरवणूक काढून ग्रामवासीयांनी मराठी भाषा जतन करण्याचा संदेश दिला. यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा आरती डायरे तथा प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच अमोल आखुड,लोकमत वार्ताहर विनोद घोडे, पोलिस पंचनामा चे वार्ताहर श्याम ढोले उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षीका सुरेखा ढोले तथा आभार माहेश्वरी इंगोले हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावातील युवक सौरभ ठाकरे, सारंग भोयर, भाविक आखुड सारिका डायरे, प्रतिक्षा शंभरकर, नेहा डफरे, किरण कांबळे, निकीता डफरे, यांनी सहकार्य केले.