चिकन मटन च्या दुर्गंधीमुळे पिपरि वासीयांचे आरोग्य धोक्यात
प्रतिनिधी / वर्धा
वर्धा शहराला लागूनच असलेल्या पिपरी ग्रामपंच्यायतच्या हद्दीत येणाऱ्या जुनापाणी चौकातील मुख्य रस्त्यावर चिकन, मटनाच्या वेस्टेज मटेरियल टाकत असल्याने परिसरातील नागरिकांना मोठया प्रमाणात दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
याच रस्त्याने गावतीलच नागरिकांसोबतच आर्वीकडे जाणाऱ्या वाहनचलकांना सुद्धा याठिकणी दुर्गंधीचा सामना करावा लागतो. आर्वीनाका भागात असलेले सैलाणी चिकन सेंटर मधून संपूर्ण वेस्टेज या जुनापाणी चौकामध्ये आणून टाकतात यासोबतच ते मरण पावलेल्या कोंबड्या तसेच सडलेले कांदे ,कोंबड्यानचे पंख, तसेच मटन याच ठिकाणी आणून टाकतात. यामुळे यासर्व घाणीचा गावकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच शाळेच्या लहान मुलांना सुद्धा या दुर्गंधीचा स्मन करावा लागतो . या दुर्गंधीमुळे शाळेतील मूल आपला जेवणाचा डबा सुद्धा शाळेत जेवण न करताच परत आणत असल्याचे मुलांच्या पालकांनी सांगितले आहे.
पिपरी ग्रामपंच्यायतचे सरपंच अजय गौळकर यांनी चिकन, मटन दुकानदारांना ग्रामपंच्यायत मार्फत नोटीसी बजवल्या परंतु दुकानदारांनी त्या नोटीसीला न जुमानता त्याच ठिकाणी त्यांच्याकडे असलेले वेस्टेज मटेरियल चौकात टाकून परिसरात दूर्गंधीचे वातावरण पसरवत आहे . ग्रामपंच्यायत प्रशासनाने परिसरातील चिकन , मटन च्या दुकानदारांवर्ती लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नगरीकांनी केली आहे.