छत्रपती शिवाजी महाराज शौर्य यात्रेचे जागरण,शौर्य यात्रेचे समारोप ८ ऑक्टोंबर देवळीत.
देवळी : छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक काला ३५० वर्ष पूर्ण झाले.तथा विश्व हिंदू परिषद च्या स्थापनेला ६० वर्षे पूर्ण झाल्या निमित्य विश्व हिंदू परिषद ने संपूर्ण महाराष्ट्र मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जनजागरण यात्रा काढली आहे.ही यात्रा यवतमाळ वरून फिरत फिरत देवळी येथे ८ ऑक्टोंबर रोजी बाईक रॅली काढून दुपारी ३ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळून,यवतमाळ रोड बस स्टेशन समोरून,गांधी चौक,ठाकरे चौक,पोलीस स्टेशन समोरून,बाजार चौक,आठवडी बाजार चौक येथे या यात्रेचा समारोप देवळी येथे होत असून याप्रसंगी शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर मार्गदर्शन करण्याकरिता सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून म्हणून केंद्रीय संयुक्त मंत्री गोरक्षक विभाग शंकर गायिकर,तसेच सभेचे अध्यक्ष म्हणून समाजसेवक मोहन अग्रवाल, . त्याचप्रमाणे ह.भ.प.तुकाराम दादा घोडे महाराज,तसेच परमपूज्य सद्गुरू स्वामी महानंद जी महाराज यांच्या परम शिष्या सुश्री अमरानंद भारती,तसेच अटल पांडे विदर्भ प्रांत प्रमुख, सुभाष राठी विश्व हिंदू परिषद वर्धा जिल्हा अध्यक्ष,बबलू राऊत वर्धा जिल्हा संयोजक बजरंग दल हिंदू परिषद,बालू राजपुरोहित वर्धा जिल्हा मंत्री विश्व हिंदू परिषद,मुन्ना यादव वर्धा जिल्हा यात्रा सहप्रमुख बजरंग दल विश्व हिंदू परिषद,यांची सुद्धा यावेळी उपस्थित राहणार आहे. सोबतच देवळी विश्व हिंदू परिषदचे पदाधिकारी हे सुद्धा प्रामुख्याने हजर राहणार आहे असे आयोजक विश्व हिंदू परिषद चे सर्व सभासद यांनी प्रसिद्धी पत्रका द्वारे कळवले आहे.
सागर झोरे सहासिक न्यूज-24 देवळी