जळगावातून अल्पवयीन मुलीला पळविले
Byसाहसिक न्युज 24
पंकज तायडे/मुक्ताईनगर:
शिरसोली नाका परिसरात राहणारी १७ वर्षीय मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले आहे.२ जुलै रोजी रात्री उशीरा रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला डीमार्ट समोरील शिरसोली नाका परिसरात १७ वर्षीय मुलगी आई, वडील आणि भाऊ यांच्यासह वास्तव्याला आहे.मुलगी मु.जे.महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. २ जुलै रोजी सकाळी११.३०वाजता कॉलेजला जावून येते असे सांगून घरातून गेली. सायंकाळपर्यंत मुलगी घरी न परतल्याने आईवडीलांनी तिची शोधाशोध करण्यास सुरूवात केली. नातेवाईक आणि मैत्रीणींकडे तपास करून ही कोणतीही माहिती मिळाली नाही. रात्री उशीरा मुलीच्या आईने रामानंद नगर पोलीस ठाण्यात तिला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दिली या तक्रारीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला