जळगाव पुन्हा हादरले ; तरूणाची क्रूर हत्या
साहसिक न्युज 24
मुक्ताईनगर (जळगाव)/ पंकज तायडे:
जळगाव शहरातील शाहू नगर परिसरात एकाचा खून झाल्याची घटना भर दिवसा घडल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
या संदर्भात मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, शाहू नगर परिसरात असणार्या जळकी मीलच्या मोकळ्या मैदानाच्या बाजूला एका तरूणाचा रक्तबंबाळ अवस्थेतला मृतदेह आढळून आला. परिसरातील नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिल्याने पथक घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, मयत व्यक्ती हा रहीम शहा उर्फ रमा ( वय २५, रा. गेंदालाल मील, जळगाव) हा असल्याची माहिती समोर आली. आज दुपारीच कुणी तरी अज्ञात मारेकर्यांनी त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याला संपविल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.