जाम, वडनेर ,हैद्राबाद महामार्ग वरून होणारी गौ तस्करी थांबवा
By साहसिक न्युज 24
प्रतिनिधी/ वर्धा :
जिल्ह्यातील हिंगणघाट मतदार संघाच्या परिसरातील हिंगणघाट व वडनेर पोलीस स्टेशन हद्दीतून अवैधरित्या गौ-तस्करी थांबविण्याबाबत माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक सौरभ तिमांडे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पोलीस महासंचालक मुंबई व पोलीस आयुक्त नागपूर यांना उपविभागीय अधिकारी मार्फत कारवाई करण्याची निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
गेल्या अनेक दिवसापासून हिंगणघाट पोलीस स्टेशन हद्दीतील कांडळी ते जांब चौरस्ता तसेच वडनेर पोलीस स्टेशन हद्दीतील वडनेर ते येरला बॉण्ड्री पासून हैदराबाद पर्यंत अवैधरित्या गाय,बैल,म्हैस,गोऱ्हे इत्यादी पशुधनाची दहा चाकी ट्रक, मेटाडोर,टेम्पो सारख्या अशा अनेक महागड्या गाड्या द्वारे गौ-तस्करी केल्या जाते आहे.
शहरातून गेलेला नागपूर-हैदराबाद हा महामार्ग अनेक अवैध धंद्याचे हब बनल्याचे चित्र दिसत आहे. हिंगणघाट शहरातील व तालुक्यातील गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांच्या गोवंशाची चोरी करून कत्तलखान्यात पोचविणारी टोळी सक्रिय आहे व या महामार्गाने तस्करीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे यामध्ये खूप मोठे रॅकेट असून कत्तलखान्याचे चालक व गौ-तस्करी करणाऱ्या टोळीचा परदा फास करून आरोपींवर कारवाई करणे गरजेचे आहे असे असले तरी यावर कारवाई करण्याकडे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे.
गोवंश चोरुन कत्तल करणाऱ्यांवर गोवंश हत्या बंदीचे कलम लावावे तसेच हिंगणघाट मतदार संघाच्या परिसरातुन अवैधरित्या होणारी गौ-तस्करी व मास निर्यात त्वरीत थांबवावी, चोरट्यांचे पुर्ण टोळके अटक करुन गोवंश चोरीला आळा बसावा या करीता आपण स्वयंस्फुर्तीने आपली प्रतिष्ठाने बंद ठेऊन मुक्या प्राण्यांवर सद्भावना व्यक्त करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस व नगरसेवक सौरभ तिमांडे यांच्यावतीने करण्यात आली तसेच संबंधित मुद्द्यावर आपल्याकडून योग्य कारवाई न झाल्यास हिंगणघाट राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.