जिल्हा व सत्र न्यायालय येथे ई-फायलिंग फॅसिलीटी सेंटर चे उद्घाटन समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
वर्धा:-ई-फायलिंग फॅसिलीटी सेंटर चे उद्घाटन कार्यक्रम उपस्थित मान्यवर तथा कार्यक्रमाचे उद्घाटक मा. आशुतोष करमरकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश वर्धा यांचे शुभहस्ते ई-फायलिंग फॅसिलीटी सेंटर चे फित कापून उद्घाटन करण्यात आले, तसेच ई-फायलिंग सेंटर बोर्डाचे सर्व मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले तसेच कार्यक्रमात बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅन्ड गोवा चे पालक सदस्य मा. अॅड. आशिष देशमुख व मा. अॅड.पारिजात पांडे साहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक म्हणुन उपस्थित होते. तसेच अॅड. अविनाश ईमाने वर्धा जिल्हा ई-फायलिंग प्रमुख उपस्थित होते.तसेच बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅन्ड गोवा चे पालक सदस्य मा. अॅड. आशिष देशमुख यांनी ई-फायलिंग फॅसिलीटी सेंटर याबाबत सखोल व विस्तृतपणे उपस्थित वकील मंडळींना मार्गदर्शन केले व बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅन्ड गोवा चे पालक सदस्य मा. अॅड. पारिजात पांडे साहेब यांनी ई-फायलिंग विषयी मनोगत व्यक्त केले. त्याच प्रमाणे वरील कार्यक्रमाचे उद्घाटक प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश मा. आशुतोष करमकर यांनी ई-फायलिंग व फॅसिलीटी सेंटर बाबत, आधुनिक काळातील गरज व सकारात्मक फायदे याबाबत कार्यक्रमात उपस्थित असलेल्या वकील मंडळींना महत्व पटवून मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्तावित वकील संघ वर्धा चे अध्यक्ष मा. अॅड. लोहवे सर यांनी केले व संचालन वकील संघ वर्धा च्या उपाध्यक्ष अॅड. अनिता ठाकरे यांनी केले. तसेच मंचावर उपस्थित आलेल्या मान्यवरांचे आभार प्रदर्शन वकील संघ वर्धा च्या सचिव अॅड. अनुजा देशपांडे मॅडम यांनी केले. वरील कार्यक्रमात मोठया संख्येने वर्धा वकील संघाचे वकील मंडळी उपस्थित होते..
अविनाश नागदेवे सहासिक न्यूज-24