जि प उच्च प्राथमिक शाळा साटोडा येथे “संविधान दिन”व २६/११ शहीद दिन संपन्न—
संविधान म्हणजे भारताचा आत्मा—-रवींद्र पावडे
वर्धा : जि प उच्च प्रा शाळा येथे संविधान दिन व शहीद दिन शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र पावडे यांचे अध्यक्षतेखाली व प्रमूख अतिथी म्हणून अरुणा हजारे,नितेश आडे,मंजिरी डुकरे यांचे व विद्यार्थ्यां च्या उपस्तीतीत संपन्न झाला.
प्रारंभी महामानव ,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेचे पूजन व पुष्यमाला अर्पण करण्यात आली.२६/११/२००८ ला झालेल्या मुंबई येथील आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेले नागरिक व कर्तव्यदक्ष अधीकारी, पोलीस याना मौन पाळून आदरांजली देण्यात आली,विद्यार्थ्यांना नेमकं काय घडलं होत याची जाणीव करून देण्यात आली.
याप्रसंगी संविधान दिनाचे महत्व,त्या बाबत विस्तृत माहिती रवींद्र पावडे ,अरुणा हजारे.नितेश आडे,मंजिरी डुकरे यांनी विषद केले.
संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन नितेश आडे व आभार अरुणा हजारे यांनी मानले.
सागर झोरे साहसिक न्यूज -24