तळेगाव दशासर ते देवगांव महामार्गावर उमेद मिनी मालवाहुची टॅकर ला धडक…..

0

धडकेमध्ये दोघाचा मुत्यू तर दोघे गंभीर जखमी.

                मृतक विजय मांढरे वय ३२ वर्ष रा.बोपापूर वाणी.

 मृतक राहुल रामदास मांढरे वय २६ वर्ष रा.बोपापूर वाणी 

देवळी -/ देवळी येथिल महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोती संसाधन केंद्राची मिनी मालवाहु या वाहनाने उभ्या असलेल्या डिझल टॅकरला जोरदार धडक दिल्याने दोघे जागीच मुत्यू तर दोघे गंभीर जखमी झालें.हा अपघात औरगाबाद महामार्गवर तळेगाव दशासर पासून काही अंतरावर लोहिया यांच्या शेताजवळ झाला.काही कारणाने रसत्याच्या.कडेला उभा असलेला डिझल टॅकर MH 38,D 9786 या टॅकरला महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोनती संसाधन केंद्राची मिनी मालवाहक MH, 32AJ3478 मध्ये चालकास ह् चार जण बसले होते.देवगांव कडे येत असतांना भरधाव वेगाने मिनी मालवाहकाने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला.या अपघातातील मुतक जखमी देवळी तालुक्यातील बोपापूर वाणी येथील आहे.
राहुल रामदास मांढरे वय २६,तर विजय विठ्ठल मांढरे वय ३२,वर्ष रा. बोपापूर वाणी तालुका देवळी या दोघाचा घटनास्थळी मूत्यू झाला. तसेच निलेश सोनबाजी नान्हे रोजगार सेवक रा.बोपापूर वाणी व चालक किशोर रामचंद्र नेहारे वय ३२ वर्ष रा . लोणी, तालुका देवळी हे गंभीर जखमी झाले. जरवमीना महामार्ग पोलिस पथकाने व तळेगाव पोलिस विभागाने धामगाव येथे ग्रामीण रुग्नालय येथे दाखल केले. मुतक युवकामध्ये बोपापूर वाणी गावामध्ये शोककळा पसरली होती.
मिनि मालवाहक महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोनती संसाधन केंद्राची असून घरपोच मटन व्यवसाया करीता वातानुकूलीत व्हॅन ऐवजी मालवाहक घेण्यात आलेली आहे .घरपोच मटन योजना वर भरमसाठ खर्च करण्यात आला तो यशस्वी होऊ शकला नसल्यामुळे सदर मिनि मालवाहन भांडे तत्वावर बचत गटाला देण्यात अल्यांचे सांगण्यात आले.
सदर वाहन बोपापूर वाणी येथिल वेणूबाई रामचंद्र नेहारे या श्रध्दा स्वयम साहयता बचत गटाच्या आहे. त्यांना दरमहा .8000 रूपये ११ महिन्याच्या भाडेतत्वावर करारावर मिनी मालवाहु देण्यात आले.. असून या वाहनाचा चार महिन्याचा किराया थकित असल्यांचे सांगण्यात आले आहे.
झालेल्या अपघात तात वाहन चे बरेच नुकसान झाले सांगण्यात येत असून वाहनावर दुरुस्ती खर्च मोठ्या प्रमाणात येणार असल्याने वाहनाचा विमा असणे आवश्यक गरजेचे आहे. अन्यर्था संस्थेवर भुंदड पडेल पोलिस विभागाने सांगितले.

सागर झोरे साहसिक न्यूज -/24 देवळी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!