तूर पिकाची बीजप्रक्रिया करूनच पेरणी करा….

0

वर्धा -/ तूर हे खरीप हंगामातील एक प्रमुख दाळवर्गीय पीक आहे. मागील वर्षी तूर पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून आला त्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला. तूर पिकावरील मर रोगाचा प्रादुर्भाव टाळण्याकरिता तसेच त्याचे प्राथमिक अवस्थेत व्यवस्थापन होण्याकरिता पेरणी अगोदर बीजप्रक्रिया करणे अत्यंत महत्वाची ठरू शकते.तूर पिकामध्ये मर हा अत्यंत महत्वाचा रोग आहे, हा रोग फ्यूजारियम ऑक्सिस्पोरम (उडम) या बुरशीमुळे होतो. हा रोग जमिनीतून उदभवतो. हा रोग मुख्यत: पीक फुलोर्यािवर असतांना तसेच शेंगा धरण्याचे कलावधीत आढळतो. मागील पिकाचे अवशेषामध्ये बुरशीचे वास्तव्य असल्यास पुढील वर्षीच्या हंगामात हा रोग आढळून येतो. प्रादुर्भावग्रस्त झाडे मुलूल होतात. पिकास पाणी देऊनही पाण्याचे वहन या बुरशीच्या प्रादुर्भावामुळे थांबल्याने झाडांच्या वरच्या भागात पाणी पोहचत नाही. त्यामुळे पाने पिवळी पडतात व नंतर झाड मरते. झाडाची मुले उपटून पाहील्यास ते इतर सशक्त झडाप्रमाणेच असतात, परंतु मुळाचा उभा काप घेतल्यास त्यामध्ये मुळाचे झायलेम-उती काळी पडलेली आढळते.म्हणून तूर पिकावरील मर रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पेरणीपुर्वी १० दिवस अगोदर एक एकर क्षेत्रफळाकरिता जमिनीमध्ये थोड्याप्रमानात ओलावा असतांना २ किलो/लीटर ट्रायकोडार्मा २५ ते ३० किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून जमिनीवर फेकावा म्हणजे मातीप्रक्रिया करावी व त्यानंतर बीजप्रक्रिया करतांना प्रथम रसायनिक बुरशींनाशक कार्बोक्झिन ३७.५ टक्के अधिक थायरम ३७.५ टक्के (संयुक्त बुरशींनाशक) ३ ग्रॅम व त्यानंतर ट्रायकोडर्मा ४ ते ५ ग्रॅम प्रती किलो बियाणे याप्रमाणे बिजप्रक्रिया करावी. असे आव्हाहन डॉ. निलेश वझिरे विषय विशेषज्ञ (पिक संरक्षण) तसेच डॉ. जीवन कतोरे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा जिल्हा वर्धा यांच्या वतीने शेतकरी बांधवांना करण्यात येत आहे.

 चैताली गोमासे साहसिक न्यूज -/24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!