तालुक्यातील २६ शिवसैनिक पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे.
शिवसैनिकांनी केली संपर्कप्रमुख निलेश धुमाळ यांना हटवण्याची मागणी.वर्धा जिल्हा शिवसेना पक्ष फोडीची सुपारी घेतली असल्याचा आरोप असलेले वर्धा जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख हाच तो निलेश धुमाळ
देवळी : तालुक्यातील शिवसेना उद्धव ठाकरे गटातील देवळी विधानसभा क्षेत्रातील शिवसैनिक पदाधिकाऱ्यांच्या नुकत्याच नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.नियुक्त झालेल्या शिवसैनिकांना पदावर नियुक्त झाल्याची किंचित ही कल्पना देण्यात आलेली नाही व कामाचा प्रत्यक्षपणे माहिती न घेता आपल्या मनमर्जीप्रमाणे पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहे.नियुक्ती करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे देऊन तसेच मागील पदावर कार्यरत असलेल्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा राजीनामे देऊन निलेश धुमाळ यांना संपर्क पदावरून हटवण्याबाबत माजी जिल्हाप्रमुख अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली आंबेडकर वाचनालयामध्ये पत्रकार परिषद घेऊन २६ पदाधिकाऱ्यांनी सामूहिकपणे राजीनामे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवण्यात येत असल्याचे सांगितले.यावेळी अजिंक्य तांबेकर,घनश्याम वडतकर,पंकज झोरे निलेश तिडके,डॉ. निलेश गुल्हाने यांनी पत्रकार परिषद मध्ये निलेश धुमाळ संपर्कप्रमुख त्यांनी केलेल्या नियुक्त्या शिवसैनिकांना विश्वासात घेण्यात आलेल्या नाही.माजी जिल्हाप्रमुख अशोक काकडे यांना त्यांच्या नियुक्ती बद्दल सुद्धा त्यांना विचारले नाही यामुळे पक्षाला मोठे नुकसान होईल असे मत त्यांनी व्यक्त केले.व इतरही पदाधिकारी राजीनामे देणार असून ग्रामीण सर्कल प्रमुख चार,तर उपतालुकाप्रमुख दोन,पंचायत समिती विभाग प्रमुख सात,व इतर पदाधिकारी मिळून २६ पदाधिकाऱ्याने आपले राजीनामे पक्षप्रमुखाकडे पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले.डॉ.गुल्हाने यांनी आपले मत व्यक्त करताना निष्ठावन लोकांना बाजूला करण्याचे काम संपर्कप्रमुख निलेश धुमाळ करीत असून यामुळे जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये गटबाजी निर्माण करण्याची व पक्ष संपुष्टात आणण्याची जबाबदारी व सुपारी घेतल्याचा आरोप त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत केला. जिल्ह्यात मागील तीस वर्षापासून पदाधिकारी व शिवसैनिक यांनी वरिष्ठांकडे अरविंद सावंत,प्रकाश वाघ,अरविंद नेरकर,विनायक राऊत, अनिल देसाई,यांना या संदर्भात निवेदन सुद्धा देण्यात आले होते,परंतु त्यांनी याची दखल घेतलेली नाही.त्यामुळे प्रसार माध्यमाद्वारे पक्षप्रमुखापर्यंत आवाज पोहोचवण्यासाठी आमची धडपड असल्याचे अजिंक्य तांबेकर यांनी सांगितले.यावेळी पत्रकार परिषदेला माजी जिल्हाप्रमुख अशोक काकडे,अजिंक्य तांबेकर,महेश जोशी, घनश्याम वडतकर,निलेश तिडके, पंकज झोरे,सुहास कुरटकर,सचिन मांडवकर,योगेश ढाकुलकर,सतीश वैरागडे,स्वप्निल भगत,पवन जगताप, हर्षल कैकाडे,समीर वानखेडे,यश बेलंनकर,विनीत राऊत,प्रफुल आसरे,प्रज्वल केकापुरे, यांच्यासह इतर शिवसैनिकांची पत्रकार परिषदेमध्ये उपस्थिती होती.
सागर झोरे साहसिक न्यूज/24