माजी आमदार प्रा.राजु तिमांडे व वि.रा. आघाडीचे अनिल जवादे यांच्या नेतृत्वात निवेदन सादर.
प्रश्न मार्गी लावण्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आश्वासन.
हिंगणघाट / तुळजापूर रेल्वे स्टेशन परिसरातील २५ गावाच्या विद्यार्थी यांचा रेल्वे मेल गाड्यांचा थांबाचा प्रश्न सुटावा या मागणीसाठी केंद्रीय सडक परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची माजी आमदार प्रा.राजु तिमांडे व विदर्भ विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अनिल जवादे यांनी भेट घेऊन चर्चा केली व निवेदन दिले.
तुळजापूर येथे सुरू असलेल्या बेमुदत साखळी उपोषणाला दिनांक ०९ फेब्रुवारी २०२४ ला माजी आमदार प्रा.राजु तिमांडे व अनिल जवादे यांनी आंदोलन स्थळी भेट दिली व त्यांच्याशी चर्चा केली व मागणी लक्षात घेत पाठिंबा जाहीर केला.
दिनांक ११ फेब्रुवारी २०२४ला तुळजापूर रेल्वे स्टेशन इथून विदर्भ राज्य आघाडीचे शिष्टमंडळ व ग्रामस्थ घेऊन केंद्रीय सडक परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली व तुळजापूर रेल्वे स्टेशन परिसरातील २५ गावाच्या विद्यार्थ्यांच्या मेल गाड्यांचा थांबा संबंधित चर्चा करून सविस्तर माहिती दिली.विदर्भ राज्य आघाडीचे जिल्हाध्यक्ष रामकिशोर रामाजी शिगनधुपे यांच्या नेतृत्वात गेल्या पाच वर्षापासून तुळजापूर रेल्वे स्टेशनला मेल गाड्यांचा थांबा मिळावा म्हणून भरपूर आंदोलने चर्चा बैठकी झाल्या परंतु तुळजापूर रेल्वे स्टेशनला थांबा मिळत नसुन फक्त सहानुभूती पत्र व आश्वासन मिळतं आहे हा जिवंत प्रश्न लक्षात घेत माजी आमदार किमाने व अनिल जवादे यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन पाठिंबा दिला. हा लढा आपण सर्व एकत्र लढू असे मत व्यक्त करण्यात आले. याच मागणी करिता केंद्रीय मंत्री गडकरी यांची सर्वांनी भेट घेऊन मागणी लक्षात आणून दिली.
कविडच्या आधी तुळजापूर रेल्वे स्टेशनला मेल गाड्यांचा थांबा होता.कविडमध्ये गाड्यांचा थांबा बंद झाला परंतु कोविड परिस्थिती नॉर्मल झाल्यानंतरही गाड्या थांबा सुरू न झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक परिस्थिती वाईट होतं चाललेली आहे व आता लवकरच परीक्षा सुद्धा सुरू होणार आहे .तुळजापूर रेल्वे स्टेशन वरून २५ गावातील विद्यार्थी वर्धा,नागपूर, अमरावती या शहरांमध्ये उच्च शिक्षणाकरिता जातात आणि
रेल्वे प्रवास हेच एकमेव साधन आहे.रेल्वे प्रशासनाने फक्त आश्वासने आणि सहानुभूती पत्र दिले परंतु गाड्यांचा थांबा सुरू अजूनही केला नाही त्यामुळे तुम्ही यामध्ये मध्यस्थी घेऊन लवकरच गाड्यांचा थांबा सुरू करावा अशी चर्चा करण्यात आली व माहिती दिली . २७ जानेवारी २०२४ पासून तुळजापूर रेल्वे स्टेशन समोर बेमुदत साखळी उपोषण विदर्भ राज्य आघाडीचे जिल्हाध्यक्ष रामकिशोर रामाजी शिगनधुपे यांच्या नेतृत्वात २५ गावातील ग्रामस्थ कामगार रेल्वे प्रवासी करत आहे .आज १६ दिवस पुर्ण होतील परंतु अजूनही वर्धा लोकसभा खासदार यांनी भेट सुद्धा दिली नाही आणि २५ गावातील विद्यार्थ्यांचा प्रश्न अजूनही प्रलंबितचं आहे .
परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे.
तरी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याचा विचार करून गडकरी साहेब यांनी २५ गावातील विद्यार्थ्यांचा प्रश्न ताबडतोब मार्गी लावावा असे शिष्ट मंडळ यांनी विनंती केली.
नितीन गडकरी या विषयाच्या संबंधित माहिती असून सोळा दिवसापासून हे बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे असं त्यांनी शिस्त मंडळाला सांगितले लवकरच प्रलंबित रेल्वे मेल गाड्यांच्या थांबाचा प्रश्न मी मार्गी लावणार व स्वतः रेल्वे मंत्र्यां सोबत चर्चा करून हा प्रश्न लवकर मार्गी लावणार असे शिस्त मंडळाला गडकरी साहेबांनी शब्द दिला.
त्यावेळी उपस्थित माजी आमदार प्रा.राजु तिमांडे,अनिल जवादे,आशिष इंझनकर,ॲड.अरूण येवले,अरुण गावंडे, संदीप वाणी सरपंच, आतिश घूडे,मंगेश काकडे ,सुनील जयस्वाल ,राकेश उंरकांदे भालेराव अडे ,स्वप्निल ठाकूर अजय राजूरकर,राहुल बैस,श्रीराम पाटील,रमेश साळवे गजानन तिडके, भूषण कावळे आदी उपस्थित होते.