तू हमे खुश कर दे, तेरे पती को छोड दूंगा’, वर्ध्यातील संतापजनक प्रकार

0

Byसाहसिक न्युज24
प्रमोद पाणबुडे/ वर्धा:
‘तू हमे खुश कर दे, तेरे पती को छोड दूंगा’ असं म्हणतं ४ जणांनी विवाहितेचा विनयभंग केल्याची घटना वर्धा शहराच्या शांतीनगर परिसरात घडली. आरोपींनी जुन्या वादाचा वचपा काढत विवाहितेच्या घरात अनाधिकृत प्रवेश केला. त्यानंतर शस्त्राचा धाक दाखवून शिवीगाळ करत विवाहितेचा विनभंग केला. याप्रकरणी, पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी (Police) ४ संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या आहे.
रिहास उर्फ सुरेश राजपूत, सौरभ प्रकाश गावडे, सुरज राजपूत, अंकुश तिरपुडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. प्राप्त माहितीनुसार, महिलेचा पती सूरज यादव याचा आरोपींसोबत जुना वाद आहे. याच वादाचा वाचवा काढण्यासाठी चौघांनी शांतीनगर येथील रहिवासी महिलेच्या घरावर सशस्त्र हल्ला चढवला.
सूरज घरी नसल्याने चौघांनी त्याच्या पत्नीस तेरा पती कहा है उसे जान से मारना है, अशी धमकी दिली. विवाहितेने पती घरी नसल्याची सांगताच पतीला माफ करण्याची विनवणी केली. मात्र मदधुंद असलेल्या चौघांनी हमे खुश कर दे तेरे पति को छोड दुंगा, असे म्हणत विवाहित शिवीगाळ करून तिला व तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली.
दरम्यान, घाबरलेल्या विवाहितेने याबाबतची तक्रार रामनगर पोलिसात केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत चौघांनाही अटक केली. आरोपी नेहमीच आपल्याकडे वाईट नजरेने पाहत असून पतीला जुन्या वादातून त्रास देत आहेत. आजपर्यंत हे त्रास मी सहन करत आले आता हे असह्य झाल्याने तक्रार देत असल्याच पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!