तो माझा बॉयफ्रेंड होता, तु त्याला मेसेज का केला?’; तरुणींची फ्री-स्टाईल हाणामारी: एक रुग्णालयात दाखल
- प्रमोद पानबुडे/ वर्धा : प्रेम हे प्रेम असतं…तुमचं आमचं सारखच असतं… या म्हणीप्रमाणे सध्या 14 ते 20 वर्षाच्या तरुणपिढीवर प्रेमाचे आकर्षण जास्तच आहे. मात्र, प्रेमाचा केव्हा ‘ धोका ’ होतो. हे समजतच नाही. अशीच घटना वर्ध्यातील आयटीआय टेकडीवर सोमवारी घडली. अल्पवयीन मुलीने तिच्या ‘बॉयफ्रेंड’च्या मदतीने एका १५ वर्षीय मुलीला चांगलेच बदडले असून तिच्यावर सावंगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती आहे. १५ वर्षीय मुलगी ही शिकवणीमध्ये बसून असताना १६ वर्षीय मुलीच्या ‘बॉयफ्रेंड’चा फोन आला आणि शिवीगाळ करुन धमकी देऊ लागला. तु मला कसा काय मेसेज केला. असे म्हणत तिला आयटीआय टेकडी परिसरात बोलाविले. अल्पवयीन मुलगी भीतीपोटी तेथे गेली असता तिला दुसऱ्या मुलीने शिवीगाळ करत माझ्या ‘बॉयफ्रेंड’ला मेसेज का केले, असे म्हणू लागली. मुलीने ते फेक अकाऊंट असून मी मेसेजेस केले नसल्याचे वारंवार सांगूनही त्या मुलीने व तिच्या प्रियकराने त्या मुलीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. उपस्थित तिच्या मित्र मैत्रिणींनी वाद सोडविण्याचा प्रयत्न केला. पण, तरीही ती मुलगी ऐकत नव्हती. यामध्ये ती जखमी झाल्याने अखेर त्या मुलीला सावंगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. रामनगर पोलिसांनी जखमी मुलीच्या बयाना वरून गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही अल्पवयीन मुली असून दोन्ही वर्ध्यातील प्रसिद्ध असलेल्या बीडीएम कॉन्व्हेंट शिक्षण घेत आहे. असाच एक प्रकार मागील दोन महिन्यापूर्वी सुद्धा याच भागात घडला होता. त्यामध्ये तर एका प्रिन्सिपल ची मुलगी अडकली होती. सर्रास सुरू असून. बॉयफ्रेंड बनवणे किंवा गर्लफ्रेंड बनवणे याची स्पर्धाच लागली आहे. अशा प्रकाराला जबाबदार कोण? आई वडील की तो बोयफ्रेंड?
- क्रमक्ष