🔥हाच तो शिक्षक सोबत दडपशाही करणारा हिटलर मुख्याध्यापक अमोल जगताप🔥दहा गुणांचा पन्नास लाखांत सौदा,पवित्र पोर्टलच्या नावाखाली नोकऱ्यांचा लिलाव ?
🔥आर्णीतील त्या कुप्रसिद्ध शिक्षण संस्थेत २३ जागांच्या भरतीत कोट्यवधींच्या अर्थकारणाचा संशय,गुणवत्तेपेक्षा पैशांनाच प्राधान्य ?
🔥हिटलरशाही मुख्याध्यापकांच्या कॅबिनमध्ये मोबाईलला बंदी,शिक्षकांचे तोंड बंद करण्यासाठी कथित धमक्या
आर्णी-/ शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रालाही पैशांच्या हव्यासापोटी बाजाराचे स्वरूप देण्याचा प्रकार आर्णी शहरातील त्या कुप्रसिद्ध शिक्षण संस्थेत सुरू असल्याची धक्कादायक माहिती गोपनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. संस्थेतील २३ जागांच्या शिक्षक भरतीसाठी मुलाखती सुरू असून संस्थेच्या हातात असलेल्या अवघ्या १० गुणांच्या भरवशावर तब्बल ५० लाख रुपयांपर्यंतची बोली लावली जात असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे
शासनाने गुणवत्ताधारक उमेदवारांना न्याय मिळावा म्हणून पवित्र पोर्टल आणले मात्र या संस्थेने त्याच पोर्टलला अपवित्र करण्याचा विडाच उचलला आहे की काय हेच समजायला मार्ग नाही
🔥पैसे ठरलेल्यांची मुलाखत की निव्वळ नौटंकी ?
ज्या उमेदवारांसोबत आर्थिक व्यवहार ठरला आहे त्यांना कॅमेऱ्यासमोर सोपे प्रश्न विचारून गुणांची खैरात करण्याचा तर पैसे न ठरलेल्या उमेदवारांना अवघड प्रश्न विचारून बाद करण्याचा कथित खेळ सुरू आहे. नियुक्तीचा उमेदवार आधीच ठरविला जात असेल तर मुलाखतीचा हा दिखावा कशासाठी पैसे ठरलेल्यांची मुलाखत की निव्वळ नौटंकी तर नाही असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे
🔥मुख्याध्यापकाच्या कॅबिनमध्ये मोबाईलची एवढी दहशत का ?
मुख्य शाखेतील त्या ‘हिटलरशाही’ मुख्याध्यापकाच्या कॅबिनमध्ये मोबाईल नेण्यास मनाई करण्यात आल्याची माहिती आहे. एवढेच नव्हे तर शिक्षकांची बैठक घेऊन भरतीसंदर्भात बाहेर वाच्यता केल्यास शारीरिक व मानसिक त्रास देण्याची कथित तंबीही देण्यात आली आहे. शिक्षकांना ज्ञानदानाचे स्वातंत्र्य देण्याऐवजी त्यांच्या तोंडाला कुलूप लावण्याचा हा केविलवाणा प्रकार हिटलर मुख्याध्यापकांकडून सुरू आहे
🔥शिक्षण विभागाच्या डोळ्यांवर पट्टी बांधली आहे काय ?
शिक्षक भरतीच्या नावाखाली एवढ्या मोठ्या आर्थिक व्यवहारांची चर्चा सुरू असताना शिक्षण विभाग मूग गिळून गप्प का आहे ? सर्व मुलाखतींचे चित्रीकरण गुणपत्रिका आणि संभाव्य आर्थिक व्यवहारांची स्वतंत्र समितीमार्फत चौकशी करावी. अन्यथा गुणवत्तावान उमेदवारांच्या स्वप्नांची राख करून संस्थाचालकांच्या तिजोऱ्या भरण्यासाठीच पवित्र पोर्टल निर्माण केले आहे काय असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.(क्रमशः)