दारुबंदी कायद्याअन्वये सेलू पोलीसांची कारवाई
सेलू : येथील २६ सप्टेंबर रोजी मौजा सुरगाव शेत शिवारात गाडेघाट नदिच्या काठावर मौजा सुरगाव येथील विलास मखरे हा हातभट्टी लावून गावठी मोहा दारु गाळीत आहे अशी मुखबीरकडून खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन पंच व पोस्टापसह मुखबीर यांचे माहीतीप्रमाणे मौक्यावर जावून छापा टाकला असता मौक्यावर आरोपी नामे विलास वासुदेव मखरे, वय-31 वर्ष, रा. सुरगाव हा हातभट्टी लावून गावठी मोहा दारु गाळीत असतांना मिळून आल्याने सदर आरोपीचे ताब्यातून मौक्यावर 2 लोखंडी ड्रम मध्ये उकळता मोहा रसायन सडवा 100 लीटर, 1000 लीटर कच्चा मोहा रसायन सडवा, 50 लीटर गावठी मोहा दारु व हातभट्टी साठी लागणारे ईतर साहीत्य असा एकूण जु.कि. 1,29,200/- रु. चा माल मिळून आल्याने मौक्यावर नाश करण्यात आला असून आरोपी नामे विलास वासुदेव मखरे, वय-31 वर्ष, रा. सुरगाव ता. सेलू, जि.वर्धा यांचे विरुध्द पोलीस स्टेशन सेलू येथे कलम 65 बी,सि.एफ.मदाका अन्वये कार्यवाही करण्यात आली.सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नुरुल हसन, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सागर कवडे, मा, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात ठाणेदार सपोनि. तिरुपती राणे पो.स्टे सेलू पोलीस अंमलदार गणेश राऊत, ज्ञानदेव वनवे यांनी केली.
अविनाश नागदेवे सहासिक न्यूज-24